Dhondi Champya: हसून हसून वेडे व्हाल! 'धोंडी-चंप्या'चा ट्रेलर पाहून लोटपोट..

भरत जाधव, वैभव मांगले आणि प्रभाकर मोरेची धम्माल कॉमेडी!
dhondi champya marathi movie trailer released cast bharat jadhav vaibhav mangale prabhakar more
dhondi champya marathi movie trailer released cast bharat jadhav vaibhav mangale prabhakar moresakal
Updated on

Dhondi Champya: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' हे नाव ऐकूनच खदखदून हसायला येणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून हा एक धमाल विनोदी चित्रपट दिसतोय. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात दोन व्यक्तींसोबत म्हैस आणि रेड्याची लव्हस्टोरीची सांगण्यात आली आहे. विशेष म्हणजे विनोदाचा तडका लावायला अभिनेता भरत जाधव, वैभव मांगले, आणि प्रभाकर मोरे हे इरसाल नमुने प्रमुख भूमिकेत आहेत. (dhondi champya marathi movie trailer released cast bharat jadhav vaibhav mangale prabhakar more)

dhondi champya marathi movie trailer released cast bharat jadhav vaibhav mangale prabhakar more
Subodh Bhave: वेडी माणसं! सुबोध भावेला फॅन्सनं दिलेलं बर्थ डे गिफ्ट पाहून तुम्हीही..

ही प्रेमकथा धोंडी आणि चंप्याची आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या भरत जाधव आणि वैभव मांगले यांची म्हैस आणि रेडा एकमेकांच्या प्रेमातन पडले आहेत. त्यामुळे यांचे प्रेम यशस्वी होऊ द्यायचे का यावरून गावात मोठी खळबळ सुरू आहे. या कट्टर दुश्मनांची म्हैस - रेडा प्रेमात पडले असतानाच त्यांची मुलं ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याने मोठी धमाल या ट्रेलर मध्ये उडताना दिसत आहे. म्हैस आणि रेडा प्रेमात पडले म्हणून एकमेकांचे जीव घ्यायला निघालेले ही दोघे मुलं प्रेमात आहेत ही कळल्यावर काय करतील हे या विनोदी चित्रपटात उलगडणार आहे.

धोंडी आणि चंप्या सोबतच ही ओवी आणि आदित्यची प्रेम कहाणी आहे. ओवीच्या भूमिकेत अभिनेत्री सायली पाटील आहे तर आदित्य च्या भूमिकेत अभिनेता निखिल चव्हाण आहे. आणि यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी. तर या भांडणाला प्रभाकर मोरेची भन्नाट फोडणी असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट किती विनोदी आहे, ते ट्रेलर वरूनच कळतय. त्यामुळे आता धोंडी -चंप्या या म्हैस- रेडयाची आणि ओवी- आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे असून प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ची निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()