Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे, अशी बातमी काल (15 मार्च) सोशल मीडियावर व्हायरल झाली. शुक्रवारी बिग बींना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असंही म्हटलं गेलं. अशातच आता अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमिताभ बच्चन यांचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रिपोर्टर अमिताभ बच्चन यांना प्रश्न तुमची तब्येत कशी आहे, यावर अमिताभ बच्चन म्हणतात, 'ठिक आहे', त्यानंतर बिग बी म्हणतात, 'फेक न्यूज' आता अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची बातमी खोटी होती का?
काल ISPL च्या फायनल मॅचला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली. या मॅचमधील काही फोटो बिग बींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत सचिन तेंडूलकर आणि अभिषेक बच्चन हे देखील दिसत आहेत. या फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, "महान सचिनकडे क्रिकेटच्या खेळाविषयी असलेले अफाट ज्ञान पाहून अवाक् झालो. ISPL च्या संध्याकाळच्या फायनलमध्ये इतका आम्ही एकत्र वेळ घालवला."
अमिताभ बच्चन हे प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बिग बींचा 'गणपत' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अमिताभ बच्चन यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळल घातला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.