Dil Chahta Hai 23 Years: "तीच जादूई जागा आणि...!" 'दिल चाहता है' ला २३ वर्ष झाल्याने फरहान अख्तरची खास पोस्ट

दिल चाहता है सिनेमाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत
dil chahta hai 23 years farhan akhtar special post
dil chahta hai 23 years farhan akhtar special postSAKAL
Updated on

Dil Chahta Hai 23 Years: आमिर खान - अक्षय खन्ना - सैफ अली खान यांचा 'दिल चाहता है' सिनेमा सर्वांच्या लक्षात असेल. मैत्री - प्रेम आणि आयुष्य कसं जगायचं हे सांगणारा हा खास सिनेमा. दिल चाहता है सिनेमाने पुढे अनेक पिढ्यांना खास प्लॅन करुन गोव्याला जायला शिकवलं.

दिल चाहता है सिनेमाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दिल चाहता है चा दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तरने खास पोस्ट लिहीली आहे.

(dil chahta hai 23 years farhan akhtar special post)

dil chahta hai 23 years farhan akhtar special post
Aamir Khan Daughter: लेकीला मिळाला हा मोठा पुरस्कार! जावई आणि पुर्वपत्नीसह आमिर खान उपस्थित

फरहान अख्तरची खास पोस्ट

'दिल चाहता है' सिनेमाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने फरहान अख्तर 'दिल चाहता है' चा आयकॉनिक सीन्स जिथे शूट झाला त्या चापोरा किल्ल्यावर पुन्हा एकदा गेला.

तिथे गेल्यावर फरहान अख्तरने लिहीले, "आकाश, सिड आणि समीर यांच्या जीवनाचं चित्रीकरण केल्यानंतर पहिल्यांदाच चापोरा किल्ल्यावर परतलो. हे सर्व 23 वर्षांपूर्वी घडलं होतं. बरेच काही बदलले आहे परंतु गोव्यातील उबदार आणि समुद्राची खारी हवा तशीच आहे. काही ठिकाणे फक्त जादुई असतात."

दिल चाहता है विषयी थोडंसं...

२००१ साली आलेला दिल चाहता है आज एक आयकॉनिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. सिनेमाला २३ वर्ष झाली असली तरीही आजच्या पिढीलाही हा सिनेमा जवळचा वाटतो. फरहान अख्तरचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट.

या सिनेमात आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांनी आकाश - समीर - सीड ही भूमिका साकारली होती. याशिवाय या सिनेमात डिंपल कपाडीया, प्रिती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()