Dilip Joshi Birthday: गेली १४ वर्षे निखळ मनोरंजन करणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल'.
हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे भरीव योगदान आहे. पण तारक मेहता मालिकेतून ते घराघरात पोहोचले.
त्यांची 'हम आपके है कोन' या चित्रपटातील भूमिका ही प्रचंड गाजली आणि लोकांच्या लक्षात ही राहिली. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आज ते कोट्यावधींचे मालक असले तरी हा प्रवास सोपा नव्हता. अगदी हे करियर सोडायचं का असाही ते विचार करत होते.
आज त्यांचा वाढदिवास. त्यानिमित्ताने जाणून घेऊया, त्यांचा दिलीप जोशी ते जेठालाल हा प्रवास..
(Dilip Joshi Birthday Caree, struggle, Journey, taarak mehta ka ooltah chashmah jethalal role, success )
दिलीप जोशी यांनी अवघ्या 50 रुपयांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ते जेव्हा बॅक स्टेज ची कामं करायचे तेव्हा त्यांना फक्त 50 रुपये मानधन मिळायचे. दिलीप जोशींनी त्यांच्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात 33 वर्षांआधी अर्थात 1989 मध्ये केली. सलमान खानचा पहिला सुपरहिट सिनेमा अर्थात 'मैंने प्यार किया'मध्ये दिलीप जोशींनी 'रामू' चे कॅरेक्टर वठवलं होतं.
यानंतर ते अनेक गुजराती नाटकांमध्ये दिसले. 'ये दुनिया है रंगीन' आणि 'क्या बात है' मध्ये त्यांनी साउथ इंडियन भूमिका केली होती. सलमान खानसह शाहरुख खानसोबतही दिलीप जोशी यांनी काम केले आहे. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'मधील त्यांची भूमिका दमदार होती. तर हम आपके है कौनधील भोला कोण विसरेल बरं ?
पण मोठमोठ्या स्टार्ससोबत सिनेमे केल्यानंतरही दिलीप करिअरसाठी संघर्ष करत होते. मग हळूहळू त्यांना काम मिळणं बंद झालं, एक वेळ अशी आली त्यांनी हे करियर सोडायचा विचार केला. पण त्यांच्या आयुष्यात 'तारक मेहता' मालिका आली आणि त्यांचं आयुष्य बदललं.
2008 मध्ये दिलीप जोशींना 'तारक 'मेहता का उल्टा चश्मा' मधला बाबूजी अर्थात चंपकलाल यांचा रोल ऑफर झाला होता. पण जेव्हा दिलीप यांनी स्क्रिप्ट वाचली तेव्हा आपण जेठालालचा रोल चांगला करु शकू असं वाटलं आणि त्यांनी याबाबत मेकर्सना सुचवलं.
मग त्यांची या रोलसाठी ऑडिशन घेतली. त्यांचा ऑडीशनमधला परफॉर्मंन्स मेकर्सना खूप आवडला आणि जेठालाल मिळाला. जेठालाल या रोलचे दिलीप जोशी यांनी सोनं केलं. जवळपास 15 वर्षे ते ही भूमिका साकारत आहे.
त्यांचा 50 रुपये ते कोट्यवधीचे मालक हा प्रवास अतिशय खडतर होता, पण दिलीप जोशींनी हार मानली नाही. आता तारक मेहताच्या एका एपिसोडला ते एक - दिड लाख मानधन घेतात. त्यांची नेटवर्थ 45 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
मुंबईत त्यांनी आलिशान घर घेतलंय. त्यांच्याजवळ महागड्या गाड्यांचेही कलेक्शन आहे. टीव्ही सिरियल शिवास जाहीराती, ब्रँड्सचे प्रमोशन, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.