दिलीप कुमार यांच्या एका निर्णयामुळे खचल्या होत्या सायरा बानो

दिलीप कुमार यांच्या प्रत्येक सुख-दु:खात सायरा बानो खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभ्या होत्या.
Dilip kumar,Saira Banu
Dilip kumar,Saira Banufile image
Updated on

अभिनय व सौंदर्याच्या बळावर अभिनेत्री सायरा बानो यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात त्यांना शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. कलाविश्वातील प्रवासासोबतच खासगी आयुष्यामुळेही सायरा बानो चर्चेत होत्या. अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्नबंधनात अडकताना सायरा या २२ वर्षांच्या होत्या. १९६६ मध्ये दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी लग्न केलं. दिलीप कुमार यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सायरा या त्यांच्या एका निर्णयामुळे खूप खचल्या होत्या.

नात्यात सर्व सुरळीत सुरू असताना सायरा बानो यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. १९८२ मध्ये दिलीप कुमार यांनी अस्मा साहिबा यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांच्या या निर्णयामुळे सायरा फार खचल्या होत्या. त्यातही अस्मा यांच्यासोबत लग्न केल्याचं दिलीप कुमार यांनी बरेच दिवस सर्वांपासून लपवलं होतं. त्यांचं हे दुसरं लग्न फार काळ टिकलं नाही. अस्मा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दिलीप कुमार यांनी पुन्हा सायरा बानो यांची साथ दिली.

Dilip kumar,Saira Banu
कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत
Dilip kumar,Saira Banu
दिलीप कुमार यांनी पुण्यातील कॅन्टीनमध्ये केलंय काम

सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केलं, तेव्हा त्या २२ वर्षांनी लहान होत्या. त्यावेळी दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या प्रत्येक सुख-दु:खात सायरा बानो खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. वृद्धापकाळातील आरोग्याच्या समस्या जाणवताना सायरा यांनी दिलीप कुमार यांची देखभाल केली. सायरा या सावलीप्रमाणे कायम त्यांच्यासोबत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()