When Dimple Kapadia called Nana Patekar ‘obnoxious : नाना पाटेकर यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये दिग्गज अभिनेत्यांना जशास तसं उत्तर देणारे अभिनेते म्हणून नानांचे नाव घ्यावे लागेल. चित्रपटाचा विषय कोणताही असो त्यात नानांची भूमिका असेल तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातो हे अनेकदा दिसून आले आहे.
नाना नावाचे व्यक्तिमत्व काय आहे हे त्यांच्या सहकाऱ्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याविषयीचे मतप्रदर्शन केले आहे. नाना पाटेकर हे त्यांच्या परखड आणि सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जातात. आपल्या विचारांवर ठाम राहून समोरच्याला आपलं म्हणणं तेवढ्याच ताकदीनं पटवून देण्यात नाना नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता नानांविषयी प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी वेगळचं मत व्यक्त केली आहे.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
खरं तर डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमधून काम केलं आहे. एका मुलाखतीमध्ये डिंपल कपाडिया यांना नाना पाटेकर यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर नाना पाटेकरांच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. तो माणूस मला खूपच किळसवाणा वाटला. अशा शब्दांत डिंपल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती.
क्रांतीवीरमध्ये डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर एकत्र दिसले होते. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना भावली होती. नानांच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये क्रांतीवीर चित्रपटाचा उल्लेख केला जातो. त्यानंतर काही वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये नाना आणि डिंपल यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या. आज डिंपल कपाडिया यांचा ६६ वा वाढदिवस असून यानिमित्तानं सोशल मीडियावर कपाडिया यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल झाल्या आहेत.
डिंपल यांनी नानांच्या अभिनयाचे खूप कौतूक केले. नानाचे व्यक्तिमत्व हे आपल्याला नेहमीच दोन बाजूंचे वाटले. ते घडीत असे तर घडीत तसे अशा प्रकारचे आहेत. प्रहार या चित्रपटामध्ये पहिल्यांदा नाना आणि डिंपल यांनी काम केले होते. २०१० मध्ये आलेल्या तुम मिलो तो सही नावाच्या चित्रपटामध्ये देखील या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.
एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डिंपल यांनी म्हटले होते की, तो माणूस कसा आहे हेच मला कळत नाही. मला त्या माणसाची किळस येते. त्याचे व्यक्तिमत्वच फार वेगळे आहे. पण गोष्ट खरी की त्यांच्या सारखा गुणी अभिनेता दुसरा कुणी नाही. ते चांगले आहेत आणि वाईटही आहेत. मी ज्यावेळी त्या माणसाचे टँलेट पाहते तेव्हा त्याच्यासाठी सौ खून भी माफ है. अशा शब्दांत डिंपल यांनी नानांचे कौतूक केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.