Director Adityan: लोकप्रिय दिग्दर्शक आदित्यन यांचं दुःखद निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

कौटुंबिक टीव्ही मालिकांसाठी आदित्यन लोकप्रिय होते
 Director Adityan Passes Away at the age of 47 'Santhavanam' fame Industry In Shock
Director Adityan Passes Away at the age of 47 'Santhavanam' fame Industry In Shock SAKAL
Updated on

Director Adityan Passed Away News: लोकप्रिय मल्याळम टीव्ही दिग्दर्शक आदित्यन यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आहे.

19 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तत्काळ तिरुवअनंतपुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आदित्यनचे वयाच्या ४७ व्या वर्षी अकाली निधन झाले आणि यामुळे इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

(Director Adityan Passes Away at the age of 47)

 Director Adityan Passes Away at the age of 47 'Santhavanam' fame Industry In Shock
Virat Kohli Anushka Sharma: विराटचं वर्ल्डकपमध्ये पहिलं शतक आणि अनुष्काला आनंद, म्हणाली...

आदित्यन यांचं अंतिम दर्शन भारत भवन, तिरुअनंतपुरम येथे ठेवण्यात येईल, त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील. दिग्दर्शकाच्या निधनाने मल्याळम इंडस्ट्रीला धक्का बसला असून शोककळा पसरली आहे.

आदित्यन मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक होते. 'अम्मा', 'वेणंबडी' आणि 'संथावनम' सारखे लोकप्रिय शो त्यांनी दिग्दर्शित केले.

त्यांनी सातत्याने चांगल्या TRP असलेल्या मालिका दिल्या, ज्यामुळे ते मल्याळम उद्योगातील सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक बनले. (Latest Marathi News)

मल्याळममधला सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका 'संथावनम' चं दिग्दर्शन त्यांनी केलं. या शोमधून त्यांना इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळाली.

'कालीविडू' मालिकेतील अभिनेत्री उमा नायरने तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी शोक व्यक्त करत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आहे. आदित्यन यांच्या अकाली निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.