Karan Johar Honoured At British Parliament: बॉलिवूडमधील चर्चेत असेलेलं नाव म्हणजे करण जोहर. बॉलिवूडच्या बड्या चित्रपट निर्मात्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. करण हा मनोरंजन विश्वातलं खुप आघाडीच नाव आहे.
1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्यांने अनेक उत्कृष्ट आणि सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. या वर्षी करणने चित्रपटसृष्टीत प्रवेश करून 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
आता त्याचा मोठा सन्मान करण्यात आला आहे आणि हा सन्मान ब्रिटीश संसदेत करण्यात आला आहे , ज्याची माहिती करणने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.
पहिल्या फोटोमध्ये, करण लंडनमधील यूके संसदेबाहेर त्याला मिळालेल्या प्रमाणपत्राच्या फोटोसोबत उभा आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याने सन्मानाचा फोटो शेयर केला आहे.
फोटो शेअर करताना करणने पोस्टला कॅप्शन दिले, "आजचा दिवस खूप खास होता! लंडनमधील ब्रिटीश संसदेच्या सभागृहात लेस्टरच्या माननीय बॅरोनेस वर्मा यांच्या हस्ते सन्मानित झाल्याबद्दल मी भाग्यवान आणि मनापासून कृतज्ञ आहे. आम्ही आमचा 25 वा उत्सव साजरा केला."
पुढे करण म्हणाला की, हा त्या दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा एखाद्याला वाटतं की स्वप्ने पूर्ण होतात. 25 वर्षांच्या या प्रवासात मिळालेल्या प्रेमाबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले.
करणचे युकेशी खास नातं आहे. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'ए दिल है मुश्कील' यांसारख्या चित्रपटांचे या देशात त्याने चित्रीकरण केले आहे.
लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी 2012 मध्ये ब्रिटनच्या भेटीचे सदिच्छा दूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
करण सोशल मिडियालवर देखील खुप सक्रिय असतो. त्याला बऱ्याच वेळा ट्रोलही करण्यात येते. तो केवळ स्टारकिड्स यांनाच त्याच्या चित्रपटात संधी देतो असा आरोप करत त्याला नेपोकिंगही म्हटले जाते. मात्र करणला या गोष्टींचा काही परिणाम होत नाही. तो नेहमी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असतो.
खुप काळानंतर करण दिग्दर्शक म्हणून परतला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या त्याच्या आगामी चित्रपटातुन तो मोठ्या पडद्यावर परतला आहे.
नुकतेच या चित्रपटाते टीझर रिलिज करण्यात आले आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे ज्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.