Karan Johar on Animal: रणबीर कपूरचा 'अॅनिमल' सिनेमा अजुनही थिएटरमध्ये गाजतोय. 'अॅनिमल' निमित्ताने रणबीरने त्याच्या फिल्मी कारकीर्दीत आणखी एक हिट सिनेमा दिलाय. 'अॅनिमल' वर प्रेक्षक - समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच दिग्दर्शक - निर्माता करण जोहरने 'अॅनिमल'वर थेट प्रतिक्रिया दिलीय.
'अॅनिमल'च्या यशाबद्दल गलाता प्लसशी बोलताना करण जोहरने खुलासा केलाय की, जेव्हा त्याने 'अॅनिमल' बद्दलचे प्रेम व्यक्त केले तेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि म्हणाले, "तुम्ही रॉकी और रानी बनवला, हा 'अॅनिमल' आहे. दोन्ही सिनेमे एकमेकांपासून विरुद्ध आहेत."
करण म्हणाला, “माझ्या मते 'अॅनिमल' हा माझ्यासाठी 2023 वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. हे बोलण्यासाठी मला थोडा वेळ आणि खूप धाडस लागले. कारण जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असता तेव्हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाची थोडी भीती वाटते. मला कबीर सिंग देखील आवडला होता. त्यावेळीही इतरांना काय वाटेल याची काळजी न करता मी कबीर सिंगबद्दल मत व्यक्त केलं होतं.
करणने 'अॅनिमल'चं कौतुक करताना पुढे सांगितलं की, “अॅनिमलने अनेक बाबतीत पुढच्या पायऱ्या गाठल्या. कथा सांगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत, सिनेमाचा साचा तोडणे याशिवाय मुख्य प्रवाहातील सिनेमाशी सुसंगत असलेल्या प्रत्येक गोष्टी 'अॅनिमल'ने ब्रेक केल्यात.
अचानक तुमच्याकडे इंटरव्हल ब्लॉक येतो, जिथे नायकाला मारहाण होत आहे आणि प्रत्येकजण अर्जन वेल्ली गाणं म्हणत आहे... मला वाटले, 'असा सीक्वेन्स मी याआधी कुठेही पाहिलाच नाही?' ही क्रिएटिव्हिटी आहे. शेवटी जिथे दोन माणसे एकमेकांना मारणार आहेत आणि बॅकग्राऊंडला ते गाणे वाजवतात...त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण दृश्यात फक्त रक्त होते."
आपल्या मनातील विचारांपलीकडे 'अॅनिमल' आपल्याला घेऊन जातो. मी 'अॅनिमल' चित्रपट दोनदा पाहिला, पहिली वेळ प्रेक्षक म्हणून आणि दुसऱ्यांदा त्याचा अभ्यास करण्यासाठी. मला वाटते की 'अॅनिमल'चे यश हे मनोरंजनाचा खेळ बदलणारं आहे."
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ने आतापर्यंत जगभरात ८०० कोटींहून अधिकचा व्यवयाय केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.