Siddique Death: सलमानच्या बॉडीगार्ड सिनेमाला दिग्दर्शित करणारा सिद्दीकी यांचं निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला
Director Siddique death at the age of 63 who directs salman khan bodyguard film
Director Siddique death at the age of 63 who directs salman khan bodyguard filmSAKAL
Updated on

Siddique Death News: साऊथ सिनेमाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्दीकी यांनी ८ ला रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराच्या झटक्याने सिद्दिकी यांचं निधन झालंय. सिद्दीकीने सलमान खानचा हिंदी चित्रपट 'बॉडीगार्ड' दिग्दर्शित केला होता.

(Director Siddique death at the age of 63 who directs salman khan bodyguard film)

हृदयविकाराचा झटका आला अन्...

मिडीया वृत्तानुसार, सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्दीकी यांना घाईघाईने कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती.

त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्दीकी यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

Director Siddique death at the age of 63 who directs salman khan bodyguard film
Baipan Bhaari Deva: विशेष ऑफर! बाईपण भारी देवा या तारखेपासुन फक्त १०० रुपयात बघा

श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पार्थिव येथे ठेवण्यात येणार आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी 9 ते 11.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.

यानंतर त्यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी 6 वाजता सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सलमान खानच्या बॉडीगार्ड सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे

सिद्दीकीने 'बॉडीगार्ड'चा हिंदी रिमेक दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय करीना कपूर सुद्धा होती.

या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीचे दिग्दर्शनही सिद्दीकीने केले होते, ज्याचे नाव 'कवलन' होते. त्यात विजयने मुख्य भूमिका साकारली होती.

Director Siddique death at the age of 63 who directs salman khan bodyguard film
Gadar 2 : 'तुम्हाला हल्क, सुपरमॅन चालतो मग तारासिंगच्या नावानं पोटात का दुखतं? गदरच्या सनीचा प्रश्न

या चित्रपटातून सिद्दीकी दिग्दर्शनाखाली आले

'सिद्दीक-लाल' या जोडीने म्हणून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. १९८९ मध्ये आलेला ‘रामजी राव स्पीकिंग’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

याशिवाय 'हरिहर नगर' (1990), 'गॉडफादर' (1991), 'व्हिएतनाम कॉलनी' (1992), 'काबुलीवाला' (1993), आणि 'हिटलर' (1996) आणि 'बॉडीगार्ड' यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.