Disha Patani: "तू जिथेही असशील..", दिशाला जेव्हा येते सुशांतची आठवण

Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story
Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story Esakal
Updated on

Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story: ‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ या चित्रपटातून भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडण्यात आला आहे. एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला.

Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story
BO Collection Day 3: चुचा - हनीचा जुगाड यशस्वी! फुक्रे 3 ने वीकेंडला जमवले इतके कोटी! 'द वॅक्सीन वॉर' अन् 'चंद्रमुखी 2' ला धोबीपछाड

या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली केली होती. तर त्याचबरोबर दिशा पटानी आणि कियारा अडवाणी यांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटात होत्या. या चित्रपटात कियाराने एमएस धोनीची पत्नी साक्षीची भुमिका तर दिशाने त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दिशाने नुकतीच सुशांत सिंग राजपूतची आठवण काढली.

Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story
India's Best Dancer 3 Winner: पुण्याचा समर्पण बनला 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3'चा महाविजेता! चमकत्या ट्रॉफीसह मिळालं लाखोंचं बक्षीस!

दिशा पटानीने इंस्टाग्रामवर सुशांत सिंह राजपूतबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये एमएस धोनी चित्रपटाची एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यात दिशा आणि सुशांत बोलत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिशा लिहिले की, 'या सुंदर प्रवासाबद्दल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वांचे आभार. अशा लोकांना मनापासून प्रेम करा आणि त्या लोकांची कदर करा जे तुम्हाला एका खास मार्गाने आनंदित करतात आणि पश्चात्ताप करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे असं मी ऐकले आहे. आपण निरोप घेऊ शकलो नाही पण मला आशा आहे की तू जिथेही असशील आनंदी आणि शांत असशील.'

सध्या दिशाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी आणि दोघांच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. यासोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सनीही अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

नीरज पांडे दिग्दर्शित एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी हा भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक आहे. या चित्रपटातील सुशांत सिंग राजपूतची भूमिका यर्वांना खूप आवडली होती. तर दिशा आणि कियारा देखील लाइमलाइटमध्ये आल्या. यासोबतच दिशा पटानी या चित्रपटानंतर नॅशनल क्रश बनली.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळला. त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या चित्रपटाला सात वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद दिशा त्याच्यासोबत साजरी करु शकत नसल्याने तिने दु:ख व्यक्त केले आहे.

Disha Patani celebrates 7 years of MS Dhoni The Untold Story
Swara Bhaskar Baby: स्वराच्या घरी अनोखं सेलिब्रेशन, नातीच्या आगमनाने आजोबा झालेत भलतेच खुश

दिशा शेवटची मोहित सुरीच्या अॅक्शन थ्रिलर 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसली होती, आता ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशि खन्नाच्या 'योद्धा' या एका अॅक्शन चित्रपटात आणि कांगुवा नावाच्या तमिळ पीरियड ड्रामा चित्रपट दिसणार आहे. त्याचबरोबर ती कल्की 2898 एडी हा सायन्स फिक्शन अॅक्शन चित्रपटात प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.