दिशा सालियन मृत्यु प्रकरणात खळबळजनक खुलासा, मृत्युनंतरही फोन १० दिवस होता ऍक्टीव्ह

disha sushant
disha sushant
Updated on

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. सुशांतच्या मृत्युनंतर दिशा सालीयनचं प्रकरण देखील चर्चेत आलं.  सुशांतच्या मृत्युच्या आधी ६ दिवस म्हणजेच ८ जूनला दिशाने मुंबईतील मालाड मधील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. मात्र दिशा सालीयन मृत्यु प्रकरणाशी संबंधित एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिशा सालियनचा फोन तिच्या मृत्युनंतरही ऍक्टीव्ह होता. इतकंच नाही तर तिचा फोन तपासणीसाठी फॉरेंसिक टीमला देखील पाठवला गेला नव्हता. जवळपास १७ जूनपर्यंत दिशाचा फोन सुरु असल्याची माहिती आता समोर येत आहे. दिशाचा मृत्यु कसा झाला? याविषयीची काहीच माहिती मिळू शकलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार दिशाच्या पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी देखील झाली नव्हती. तसंच क्राईम सीनची पडताळणी देखील केली गेली नव्हती. दिशाच्या ऑटोप्सीवरुन कळालं की तिचा ऑटोप्सी रिपोर्ट हा तिच्या मृत्युच्या दोन दिवसांनंतर केला गेला होता. ज्यानंतर यावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सोशल मिडिया यूजर्सचं म्हणणं आहे की दिशा आणि सुशांत केस एकमेकांशी लिंक आहेत. सोशल मिडियावर यावरुन हे प्रकरण ट्रेंडिग देखील झालं होतं. सुशांत आणि दिशा एप्रिल महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात आले होते. दोघांमध्ये कामाच्यानिमित्ताने अनेकदा बातचीत व्हायची. 

यावर आता एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना दिशाच्या आई वडिलांनी सांगितलं की दिशाचा फोन हा तपासणीसाठीच ऍक्टीव्हेट केला गेला होता. यात कोणत्याही प्रकारचा संयश घेण्यासारखं काही नाही. दिशाच्या आई-वडिलांनी हे देखील सांगितलं की फोन मुंबई पोलिसांनी जप्त केलेला. मात्र १५ जूनला दिशाचा होणारा पती रोहन रॉय याला पोलिस स्टेशनला बोलवून त्याच्यासमोर फोन चेकिंग केलं गेलं. 

दिशाने ८ जूनला इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं होतं. आणि त्याच्या बरोबर  सहा दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र अनेक लोकांचं म्हणणं आहे की सुशांत आणि दिशा या दोघांनीही आत्महत्या केली नसून त्या दोघांची हत्या झाली आहे. इतकंच नाही तर या दोघांचा मृत्यु देखील एकमेकांशी लिंक असल्याची चर्चा आहे.   

disha salian death case her phone was active till 17 not sent to forensic  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.