Disha Salian Death: SIT तपासाच्या आदेशानंतर दिशा सालियनच्या वडिलांनी बदलले वक्तव्य!

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
Disha Salian Death
Disha Salian DeathEsakal
Updated on

Disha Salian Death Case: सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनने 2020 मध्ये आत्महत्या केली होती. मात्र आजही तिच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.

2020 मध्ये मृत्यू झालेल्या दिशा सालियनचा मुद्दा गुरुवारी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापन करण्याची घोषणा केली.

गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाचे आदेश दिले होते. आता गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश जारी केल्यानंतर दिशा सालियनच्या वडिलांचे म्हणणे आहे की ती चुकून पडली आणि तिचा मृत्यू झाला.

Disha Salian Death
Fighter Teaser: हृतिक - दीपिकाच्या 'फायटर' टीझरवर कमेंट्सचा पाऊस, पंतप्रधान मोदींशी होतीय तुलना

दिशाच्या वडिलांशी तिच्या मृत्यूच्या एसआयटी तपासाबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, काही लोक असा दावा करत आहेत की माझ्या मुलीची हत्या झाली असे मी म्हणालो पण हे चुकीचे आहे, माझ्या मुलीची हत्या झाली असल्याचा दावा मी कधीच केलेला नाही. ती चुकून पडली, परिणामी तिचा मृत्यू झाला. दिशाने ना आत्महत्या केली ना कोणी तिचा खून केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही.

दिशाच्या मृत्यूप्रकरणी मालवणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. दिशा सालियन ही सेलिब्रिटी नव्हती, पण तिच्या मृत्यूनंतर बरेच वादविवाद सुरु झाले. अनेक राजकीय नेत्याचा तिच्या मृत्यूशी संबध असल्याचा दावा करण्यात आला होता. ती सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती.

Disha Salian Death
Suhana Khan The Archies : 'सुहानानं अ‍ॅक्टिंग केली असं कसं म्हणायचं'? शाहरुखच्या लेकीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा!

8 आणि 9 जून 2020 च्या मध्यरात्री 2 वाजता इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दिशाच्या मृत्यूनंतर पाच दिवसातच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली.

तेव्हापासून दिशा आणि सुशांत या दोघांच्या मृत्यूंबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात आता दिशाच्या वडिलांनी प्रतिक्रिया बदलल्याने हे प्रकरण आणखी कोणते नवे वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.