Dr. Saleel Kulkarni - Suhana Khan: डॉ. सलील कुलकर्णी हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार. आयुष्यावर बोलू काहीच्या माध्यमातून संलीप कुलकर्णी - संदीप खरे यांनी प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी दिली.
सलील यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची आहेत. अशातच सलील यांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. द आर्चीज सिनेमातील एका गाण्याचं विडंबन करुन तिथे हे गाणं वापरलं आहे. त्यात शाहरुखची लेक सुहाना नाचताना दिसतेय.
सलील कुलकर्णी व्हिडीओ शेअर करुन लिहीतात, "एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान" विंदांच्या या कवितेचं मी १९९९ मध्ये गाणं केलं होतं...
आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती,तिने ते गायलं होतं ....
लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं.... दाद दिली...
नंतर अनेक YouTube channel ने ह्याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं.... मी अर्थातच " निषेध सुद्धा नोंदवलेला नाही"
सलील पुढे लिहीतात, "मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक YouTube चॅनल ने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले , त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा "जगभरातील मुलांनी ऐकलं ...त्यांना आवडलं हे खूप आहे " असा समजूतदार ( खरं तर बावळट आणि आळशी ) धोरण स्वीकारलं...
आता काही दिवसांपूर्वी हे गाणं ह्या धमाल editing सकट बघायला मिळालं ..ते सुद्धा viral झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून..हसण्याच्या स्टेजला आलो आहे...."
सलील शेवटी लिहीतात, "विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं...त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर " माझ्या मना बन दगड * नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते...
तर.. " एका माकडाने काढले दुकान " या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे....
आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकातायत...
विंदा....आपल गाणं HIT आहे...."
सध्या या गाण्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.