Dream Girl 2 Twitter Review: फुल मनोरंजनाचा तडका! पूजाची जादू चालतेय! नेटकरी काय म्हणताय?

Dream Girl 2 Twitter Review  Ayushmann Khurrana's Film
Dream Girl 2 Twitter Review Ayushmann Khurrana's Film Esakal

Dream Girl 2 Twitter Review Ayushmann Khurrana's Film: बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसापासून दोन सिनेमांचा बोलबाला होता त्यात एक म्हणजे सनी पाजीचा गदर 2 आणि दुसरा अक्षयचा OMG2. या सिनेमांना सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्यात रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा देखील आपली कमाल दाखवत आहे. आता त्यातच बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली आहे ती आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या कॉमेडी चित्रपट ड्रीम गर्ल 2 ने.

आज सर्वत्र हा सिनेमा रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची टिम प्रमोशन व्यस्त होती आता त्यातच ड्रीम गर्ल च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचे खुप प्रेम मिळाले होते आता या सिनेमाच्या सिक्वेलला किती प्रेम मिळेल आणि प्रेक्षकांचा या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळत आहे याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यानी प्रतिक्रिया देणे सुरु केले आहेत. तर आता या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत हे पाहूया...

आता लोकांनी ड्रीम गर्ल 2 पाहिल्यानंतर सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केले आहेत.

एकाने ट्विटरवर लिहिले की, "ड्रीम गर्ल 2 हा एक मनोरंजनचा धमाका आहे. यात आयुष्मान खुराना पूजाच्या भूमिकेत आहे. तिचा आवाज सर्वांना आवडतो. यात तिला एका नवीन आव्हानाचा सामना करावा लागतोय." अनन्या पांडे चित्रपटात त्याची सहकलाकार आणि क्रश आहे. या चित्रपटात तुम्हाला कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामा मिळेल."

तर दुसऱ्याने लिहिले की, "ड्रीम गर्ल 2 हा एक मजेदार आणि मनोरंजक चित्रपट आहे,. हा सिनेमा तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत हसवतो. हा चित्रपट मजेदार संवाद आणि विनोदाने भरलेला सिनेमा आहे."

Dream Girl 2 Twitter Review  Ayushmann Khurrana's Film
Anupam Kher : सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मला का नाही? काश्मीर फाइल्सच्या अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत

तर ड्रीम गर्ल 2 पाहिल्यानंतर अनेकांनी या सिनेमाला आयुष्मान खुरानाचा आत्तापर्यंतचा हिट सिनेमा सांगितला आहे .एकानं लिहिले की, "खरा रिव्ह्यू आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपट हिट आहे. आयुष्मान खुरानाचा अभिनय सुपरहिट आहे... पूजा परत आली आहे. अनु कपूर हे देखील खूप मजेदार आहे. परेश रावल शानदार आहे"

(Latest Marathi News)

Dream Girl 2 Twitter Review  Ayushmann Khurrana's Film
Riteish Deshmukh: रितेश देशमुखने पाहिला नागराज मंजुळेचा 'बापल्योक', पोस्ट शेअर करुन केलं मोठं विधान, म्हणाला...

अनेकांनी या सिनेमाला चार ते पाच स्टार दिले आहेत. "एकता कपूर, राज शांडिल्य आणि आयुष्मान खुराना ड्रीम गर्ल 2 सोबत परतले आहेत. मी काही काळामध्ये पाहिलेला हा सर्वात मस्त कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे. बर्‍याच वर्षांनंतरचा चित्रपट."

Dream Girl 2 Twitter Review  Ayushmann Khurrana's Film
Sharad Ponkshe : राजमाता जिजाऊंनी शिवरायांना श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी शिकवल्या; मराठी अभिनेत्याचं वक्तव्य

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, चित्रपटात अनेक दमदार स्टार्स आहेत. जे या कॉमेडी चित्रपटात प्रत्येक प्रकारे रंग मिसळताना दिसतात. चित्रपटाच्या मुख्य स्टारकास्टशिवाय, चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, असरानी, ​​अभिषेक बॅनर्जी आणि अन्नू कपूर ,सीमा पाहवाही यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com