Drishyam Remake In Korea: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण,श्रिया सरन आणि तब्बू यांच्या 'दृश्यम' सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांनी देशभरात धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला आणि दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
देशातील यशानंतर आता दृष्यम फ्रँचायझी परदेशातही धुमाकूळ घालणासाठी तयार आहे. भारतीय उत्पादन बॅनर पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अँथॉलॉजी स्टुडिओने रविवारी कोरियामधील दृश्यम फ्रँचायझीच्या रिमेकसाठी भागीदारीची घोषणा केली.
स्टुडिओने इंडिया पॅव्हेलियन येथे सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान त्यांचे संबंधित प्रमुख कुमार मंगत आणि जय चोई यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.
'दृश्यम' या चित्रपटाचा कोरिया रिमेक आणि अँथॉलॉजी स्टुडिओसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना कुमार मंगत म्हणाले, 'दृश्यम फ्रँचायझी कोरियामध्ये बनत असल्याबद्दल मी उत्साहित आहे.
यामुळे भारताबाहेर त्याचा आवाका तर वाढेलच शिवाय हिंदी सिनेमा जागतिक नकाशावरही येईल. इतकी वर्षे, आम्ही कोरियन शैलीने प्रेरित झालो आहोत. आता त्यांना आमच्या एका चित्रपटातून प्रेरणा मिळाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यापेक्षा मोठी उपलब्धी कोणती असू शकते.
(Kumar Mangat Pathak's Panorama Studios & Anthology Studios announce a partnership for the remake of 'Drishyam' franchise in Korea)
दृश्यम हा एक मल्याळम क्राईम थ्रिलर, जॉर्जकुट्टी (मोहनलाल) आणि त्याच्या कुटुंबाची कथा सांगते. हा चित्रपट पहिल्यांदा मल्याळममध्ये प्रदर्शित झाला होता. 2013 चा हा चित्रपट जीतू जोसेफने लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या यशामुळे चार भारतीय भाषांमध्ये दृष्यमचे रिमेक आणि सिक्वेल तयार झाले.
कन्नडमध्ये दृष्यम (2014), तेलुगुमध्ये दृश्यम (2014), तमिळमध्ये पापनासम (2015), आणि हिंदीमध्ये दृश्यम (2015). निर्मात्यांच्या मते, हा प्रकल्प पहिल्यांदाच अधिकृतपणे कोरियन भाषेत हिंदी चित्रपट बनत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.