'चला हवा येऊ द्या' मध्ये येणार होतात नं!';निलेश साबळेची भावूक पोस्ट

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या स्मरणार्थ अभिनेत्यानं भावना व्यक्त केल्या आहेत.
Ramesh Deo, Dr.Nilesh Sable
Ramesh Deo, Dr.Nilesh SableGoogle
Updated on

मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे २ फेब्रुवारी,२०२२ रोजी मुंबईत हृ्द्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव,अजिंक्य-अभिनव ही दोन मुलं,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे. मराठी -हिंदी सिनेसृष्टीत देव कुटुंबाची ख्याती. अमिताभ,राजेश खन्ना सारख्या सुपरस्टार्सच्या सुरुवातीच्या काळात रमेश-सीमा देव या जोडीनं एकत्र काम केलंय. आज वयाची नव्वदी पार केल्यानंतरही रमेशजी काही कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित रहायचे. आनंदानं त्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात त्यांनी वयाची शंभरी गाठेन असं म्हटलं होतं. त्यांच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मात्र शोक अनावर झाला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासाठी पोस्ट शेअर करीत श्रद्धांजली वाहिली आहे. 'चला हवा येऊ द्या' शो चा सर्वेसर्वा अभिनेता डॉ.निलेश साबळेनं(Dr.Nilesh Sable) देखील रमेश देव यांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. डॉ.निलेश साबळेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रमेश देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करीत काही दिवसांमध्ये 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात ते येणार होते असं म्हटलं आहे. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय,''मोठा माणूस! या वयातही आम्हाला लाजवेल हा उत्साह आणि शेवटपर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची इच्छा. हे आम्ही आत्ताच २७ जानेवारीला अनुभवलं. सरांनी 'हे तर काहीच नाय' मध्ये येवून आम्हाला आशीर्वाद दिला. सगळंच स्वप्नवत. त्यांच्या आयुष्यातले मंतरलेले किस्से त्यांनी सांगून आम्हाला मार्गदर्शन केले. तोंडभरून कौतूक केलं. त्यादिवशी खरंच माणसातल्या देवाला भेटल्याचा अनुभव आम्ही घेतला''.

Ramesh Deo, Dr.Nilesh Sable
अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर;असं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

पुढे त्यानं म्हटलं आहे,''पुढच्याच आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' मध्ये संपूर्ण कुटुंबासह ते येणार होते. आत्ता बातमी ऐकून खरंच काही सुचत नाही अशी सर्वांचीच अवस्था झाली आहे. पण २७ तारखेचा तो संपू्र्ण दिवस तुमच्या जवळ आम्हाला वावरता आलं,कलाकारातला माणूस कसा असावा आणि किती मोठा असावा याचा अनुभव आम्हाला आला,देव साहेब आपण खरंच ग्रेट आहात,आणि नेहमी रहाल''. १९५१ साली आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरुवात केलेल्या रमेश देव यांनी अभिनयातील खूप लॉंग इनिंग खेळली. आता-आतापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते. दोन-तीन वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या नव्वदीत त्यांनी एका मराठी मालिकेत काम केलं होतं. आजच्या कलाकरांसाठी ते खरे 'देव' माणूस होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.