ED Denies To Sending Notice Gauri Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा उद्या म्हणजेच 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा शाहरुखचा यंदाच्या वर्षातील तीसरा सुपरहिट सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या शाहरुख खान नव्हे तर त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आली होती. काल सोशल मिडियावर ईडीने शाहरुख खानची पत्नी गौरी खानला नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली होती.
लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपवर 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात गौरी खानचे नावही पुढे आल्याची माहीती होती. गौरी खानवर या रिअल इस्टेट कंपनीचे समर्थन केल्याचा आरोप होता. यानंतर ईडीने गौरीला नोटीस पाठवली असल्याची बातमी समोर आली, मात्र आता ईडीने गौरीला कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे सांगितले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आणि गौरीला कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसल्याची पुष्टी केली. ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे ईडीने सांगितले आहे. गौरी तुलसियाना ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे, या कंपनीवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, तुलसियाना ग्रुपने गुंतवणूकदार आणि बँकांचे 30 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी गौरी खानची ईडी चौकशी करेल, असा दावाही अहवालात करण्यात आला होता मात्र आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी गौरीला समन्स बजावल्याचा बातम्या फेटाळल्या आहेत.
काय होतं प्रकरण?
लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक प्रकल्प आहे. मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शहा यांनी या प्रकल्पात 2015 मध्ये 85 लाख रुपयांना फ्लॅट खरेदी केला होता.
मात्र आता कंपनी त्यांना ना फ्लॅटचा ताबा देत आहे ना त्यांची रक्कम परत करत आहेत. त्यामुळे जसवंत शहा यांनी तुलसियानी समूहाचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तर या प्रकरणात किरीट जसवंत शाह यांनी गौरी खानवर देखील काही आरोप केले आहे. या प्रकल्पाची जाहिरात गौरी खानने केली होती आणि त्यामुळेच गौरीवर विश्वास ठेवून ही मालमत्ता खरेदी केली. या प्रकरणी आता परवानगी मिळाल्यानंतर ईडी गौरी खानची चौकशी करेल अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.