Ekta Kapoor: एकता कपूर 'गूडबाय'च्या (GoodBye) ट्रेलर लॉंच दरम्यान असं विधान करुन बसली की ज्यानं खळबळ उडवून दिली आहे. हे विधान करुन म्हणे तिनं बॉलीवूडच्या खान मंडळींशी पंगा घेतल्याचं बोललं जात आहे. तिचं ते विधान बॉलीवूडच्या तिन्ही खानना चांगलंच खटकणार असं बोललं जात आहे. बॉलीवूडमध्ये प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक शाहरुख,सलमान,आमिरसोबत काम करायची स्वप्न पाहत असताना एकता कपूरला मात्र या तिघांसोबत काम करायचं नाही असं म्हणाली. एकता कपूरने हा सनसनाटी खुलासा 'गुडबाय'च्या ट्रेलर लॉंच दरम्यान केला आहे. एकता कपूरचं लहानपणापासून स्वप्न होतं की अमिताभ बच्चनसोबत(Amitabh Bachchan) आपल्याला काम करण्याची संधी मिळायला हवी. आणि तिचं हे स्वप्न 'गूडबाय' सिनेमाच्या निमित्तानं पूर्ण झालं आहे.(Ekta Kapoor Says she never wanted to work with khans...)
'गूडबाय' सिनेमात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमिताभसोबत काम करायचं आपलं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं या गोष्टींन सध्या एकता कपूर भलतीच खूश आहे. एकता कपूरच्या मते, तिनं कधीच खान मंडळी किंवा इतर कुठल्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्याचा कधी विचारही केला नाही.
'गुडबाय' ट्रेलर लॉंचच्या वेळी अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक किस्सा ऐकवताना एकता कपूर म्हणाली,''मी लहानपणापासून केवळ एका व्यक्तीसोबत काम करायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते होते बिग बी. जेव्हा लहान होते तेव्हा अमिताभ यांच्या घरी बर्थ डे पार्टीला जाणं व्हायचं. श्वेता आणि अभिषेक माझे चांगले मित्र आहेत. अमिताभ बच्चन एकदा माझ्या वडीलांना म्हणाले होते की,एकता एका ठिकाणी बसून केवळ माझ्याकडे टक लावून पाहतेय. मला नाही वाटत,मी कोणा इतर अभिनेत्यासोबत काम करायला एवढी उत्सुक होते. मला फक्त अमिताभ बच्चन यांच्यासोबतच काम करायचे होते. गूडबायच्या निमित्तानं त्यांच्यासोबत काम करायचा अनुभव खूप वेगळा होता''.
भले एकता कपूरला शाहरुख,आमिर,सलमानसोबत काम करायचे नाही. पण काही दिवसांपूर्वी तिनं आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ला विरोध होत असताना पाठिंबा दर्शविला होता. आणि आमिरला 'लीजेंड' म्हटलं होतं. एवढंच नाही तर एकताने २०१८ मध्ये आपण शाहरुख-सलमानसोबत काम का करत नाही,याचे कारणही सांगितले होते. ती म्हणाली होती,''यांच्यासोबत काम करायचे तर प्लॅनिंगमध्ये अर्ध वर्ष निघून जाईल. आणि माझा उद्देश वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनवायचा आहे. मी बॉलीवूडशी संबंधितच कुटुंबातून आहे तर, मी फोन केला मोठ्या स्टारला आणि १०० करोडच्या सिनेमाची ऑफर दिली की काम झालं,असं सहज-सोपं काहीच नसतं''.
'गुडबाय' सिनेमा हा कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. यामध्ये दाखवण्यात आलं आहे की आईच्या मृत्यूनंतर कसे वडील आणि मुलं एकत्र येतात आणि त्यांच्या नात्यात कसा पटकनं मोठा बदल होतो. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहलने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.