Elvish Yadav: एल्विशनं 'त्या' पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केला कारण... पोलिसांकडून मोठा खुलासा!

नोएडा पोलिसांनी एल्विशच्या त्या प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती रेव्ह पार्टी चर्चेत आली आहे.
Elvish Yadav
Elvish Yadav esakal
Updated on

Elvish Yadav Latest News: प्रसिद्ध युटयुबर एल्विश यादव हा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी त्यानं एका पार्टीमध्ये नशेसाठी सापाच्या विषांचा वापर (Elvish Yadav Snake Venom case) केल्याचे दिसून आले होते. त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

बिग बॉस ओटीटी २ चा विजेता म्हणून एल्विश नव्यानं त्याच्या (Bigg Boss Ott 2 Winner) चाहत्यांसमोर आला होता. सोशल मीडियावर सर्वाधिक चाहतावर्ग असणाऱ्या आणि आपल्या हटक्या स्वॅगसाठी ओळखल्या जाणाऱ्या एल्विशचा अन् त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी मुनव्वर फारुखी यांचा एक (Munawar Faruqui) व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन एका युट्युबरनं जेव्हा एल्विशची खिल्ली उडवली तेव्हा त्यानं त्या युट्युबरला मारहाण केली होती. यामुळे एल्विश वादात अडकला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनी त्या पार्टी प्रकरणावरुन (Entertainment Latest News) एल्विशवर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा (NDPS Act) दाखल केला होता. यात पोलिसांनी सापाचे विष वापरण्याचे कारण काय याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. न्यायालयानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्यावर नोएडा (Noida Gurugoan Rave Party) आणि गुरुग्राम येथील रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी असे म्हटले आहे की, त्यानं हे केवळ आपल्या नावाची प्रसिद्धी आणि चर्चा व्हावी या उद्देशानं हे कृत्य केलं होतं.

एल्विशला सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यानंतर रविवारी नोएडा येथील न्यायालयानं पुढील दोन आठवड्यांसाठी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सध्या एल्विशच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो (Elvish Yadav Mother Viral Video) आहे. त्यात त्याची आई रडताना दिसत आहे. एल्विशच्या बाबत जे काही घडले आहे त्यावरुन त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचे फॉलोअर्सही चिंतेत आहे. भरपूर पैसे कमविण्याबरोबरच एल्विशनं चाहत्यांना आपण कुणालाही घाबरत नाही. हेही दाखवून दिले. अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.