Elvish Yadav: एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आहे. एल्विशनं सागर ठाकुर या युट्यूबरला बेदम मारलं आहे. या प्रकरणी सागर ठाकुरनं एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सागर ठाकुरनं (Sagar Thakur) एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणातील त्याची बाजू मांडली. आता एल्विशनं देखील एक व्हिडीओ शेअर करुन त्याची बाजू मांडली आहे.
एल्विशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, "काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये मी मॅक्सटर्नला मारताना दिसत आहे. तर एका व्हिडीओमध्ये मॅक्सटर्न माझ्यावर आरोप करताना दिसत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही सर्व लोकांनी मला आरोपी ठरवलं. 'अरेस्ट एल्विश यादव' हा ट्रेंड देखील सुरु झाला. मी एक-एक गोष्टी या व्हिडीओच्या माध्यमातून क्लिअर करत आहे. मी आपल्या भारतीय ऑडियन्सला सांगू इच्छितो, तुम्ही खूप इमोशनल आहात. एक साइडची स्टोरी ऐकून तुम्ही खूप लवकर तुमचा निर्णय मांडता. पण दुसऱ्या स्टाइडची स्टोरी पण तुम्ही ऐकली पाहिजे."
पुढे एल्विश यादव म्हणाला, "मी तुम्हाला आता माझ्या बाजूची स्टोरी सांगतो. तुम्ही मॅक्सटर्नचं ट्विटर अकाऊंट बघा, तुम्ही युट्यूब किंवा गुगलवर पण पाहू शकता की, मी बिग बॉसमध्ये जाऊन आठ महिने झाले. या आठ महिन्यांमध्ये मॅक्सटर्न माझ्या विरोधात बोलत आहे. मला तो पोक करत होता. तो मला गवार, दोगला असं बोलत होता. तो हे सर्व फॉलोवर्ससाठी करत होता हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी त्याच्या बोलण्याला रिप्लाय द्यायला सुरुवात केली. मी एकदा त्याला म्हणालो होतो की,"तू दिल्लीला राहतो, हे लक्षात ठेव" यावर देखील त्यानं रिप्लाय केला.
"मला त्याच्यासोबत बोलायचं होतं. त्यामुळे मी त्याला नंबर मागितला. मला त्याच्यासोबत कॉलवर बोलायचं होतं. मला त्याला विचारायचं होतं की, तू माझ्याबद्दल का बोलतो? आठ महिने तू माझ्या विरोधात का बोलत आहेस? पण यावर मॅक्सटर्न मला म्हणाला, "आपण भेटून बोलूयात" मग मी त्याला व्हॉट्स अॅपवर पत्ता पाठवला. मी त्याला माझ्या घराचा पत्ता पाठवला होता.", असंही एल्विश यादवनं सांगितलं.
व्हिडीओमध्ये एल्विश म्हणाला, "मॅक्सटर्न मला म्हणाला तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत जाळीन, त्यानंतर मी चिडलो आणि मी त्याला शिवी दिली. मी त्याला म्हणालो, मीच तुला भेटायला येतो, तू मला लोकेशन पाठव. मॅक्सटर्ननं त्याच्या मित्राच्या कपड्यांच्या दुकानात मला बोलवलं. तिथं त्यानं पूर्ण सेटअप केला होता. कॅमेरा, माईक असा पूर्ण सेटअप त्यानं केला होता. यात कोणकोण सामील आहे, हे सगळं मला माहित आहे."
पुढे व्हिडीओमध्ये एल्विश म्हणाला, "मी ट्रोल करणाऱ्यांना विचारतो, तुमच्या घरांच्या कोणी असं बोललं तर तुम्ही काय कराल? हे सर्व भांडण झाल्यानंतर मी त्याला पुन्हा भेटायला बोलवलं. मला वाटलं त्याला खूप लागलं असेल म्हणून मी त्याला घरी बोलवलं होतं. पण तो आला नाही. त्यानं माझ्यावर एफआयआर केला. त्याचं मत आहे की, माझ्यावर 370 चा गुन्हा दाखल करावा. तुम्ही जर व्हिडीओ पाहिला असेल तर माझ्या हातात कोणतही हात्यार नव्हते आणि हा भाऊ म्हणतो, माझ्यावर 370 चा गुन्हा दाखल केला पाहिजे. तो मुख्यमंत्र्यांना टॅग करुन, पोलिसांना टॅग करुन मला अटक करायला सांगत आहे. त्याला काहीच लागलं नाहीये, असं माझं मत आहे. माझा पोलिसांवर आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. ते जो काय तपास करतील त्यात मी सहकार्य करायला तयार आहे. मी त्याला मारलं, त्याबद्दल मी माफी मागतो."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.