Elvish Yadav in Bigg Boss 17 News: एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता. सध्या एल्विश एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलाय.
रेव्ह पार्टीत अमली पदार्थांसोबत सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यासह सहा जणांविरुद्ध नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या सर्व प्रकरणात एल्विश यादव बिग बॉस 17 च्या घरात पोहोचलाय. एल्विश यादव आणि सलमानचा संवाद व्हायरल झालाय.
(elvish yadav in bigg boss 17 salman khan advice to him video viral)
एल्विश यादव बिग बॉस 17 च्या घरात
एल्विशने बिग बॉस 17 जिंकल्यानंतर त्याला आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांवर बोट ठेवलंय. बिग बॉस OTT 2 जिंकल्यावर एल्विशला इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या की तो ट्रॉफी सोडायला तयार होता.
बिग बॉस OTT 2 नंतरच्या ट्रोलिंगची आठवण करून देताना एल्विश म्हणाला, "कोणीतरी माझा नकारात्मक PR केला, माझ्यावर मीम्स बनवले. माझ्या आई - बाबांना सुद्धा ट्रोल केलं. आणि जेव्हा नकारात्मकता अधिक पसरू लागली तेव्हा मी ती थांबवण्यासाठी बिग बॉस OTT ची ट्रॉफी सोडण्याचा विचार केला."
एल्विशला सलमानने दिला खास सल्ला
सलमान खानने याविषयी एल्विशला म्हणाला, "जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा तुमच्या आजुबाजुला असे अनेक लोकं असतील ज्यांना तुमचा हेवा वाटेल. तुम्ही आयुष्यात जितके यशस्वी व्हाल तितके तुमच्यावर जळणारे लोकंही असतील. पण तु त्यांची पर्वा करू नकोस." असा सल्ला भाईजानने एल्विशला दिला.
एल्विशवर लागलाय गंभीर आरोप
नोएडामध्ये युट्यूबर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पाच लोकांना या प्रकरणात अटक केली आहे.
त्यांच्याकडून पाच कोब्रा आणि सापाचे विष जप्त केले आहे. हे साप ती लोक एल्विशला पुरवायचे असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर एल्विशच्या सहकाऱ्यांवर नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोपही आहे. एल्विशने मात्र सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.