Elvish Yadav: "...तेव्हा कलियुगाचा अंत होईल!" जम्मूमध्ये मारहाण प्रकरणावर एल्विशने सोडलं मौन

मारहाणीच्या चर्चांवर एल्विशने मौन सोडलंय
Elvish Yadav left silence on the beating case in Jammu vaishno devi area
Elvish Yadav left silence on the beating case in Jammu vaishno devi areaSAKAL
Updated on

Elvish Yadav News: एल्विश यादवला जम्मूमध्ये मारहाण झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. एल्विश आणि त्याचा मित्र रोहन जम्मूला गेले होते. तिथे ही मारहाण झाल्याने सर्वांना धक्का बसला.

अखेर या प्रकरणावर एल्विशने सत्य सांगितलंय. एल्विशने सोशल मीडियावर रोखठोक भूमिका घेत या प्रकरणावर मौन सोडलंय.

Elvish Yadav left silence on the beating case in Jammu vaishno devi area
Gautami Deshpande: गौतमी देशपांडे करणार लग्न! मेहंदीचे फोटो व्हायरल, कोण आहे होणारा नवरा?

मारहाण झाल्याच्या बातमीवर एल्विश काय म्हणाला?

एल्विश यादव आणि त्याचा जवळचा मित्र राघव शर्मा यांच्यावर जम्मूमध्ये जमावाने कथित हल्ला केला होता. आणि या घटनेचे चित्रण करणारा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला होता.

आता बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवने या बातम्यांबद्दल मौन सोडलंय. एल्विशने झालेली घटना सांगितली आहे.

काय आहे सत्य? एल्विश म्हणाला...

एल्विश या सर्व प्रकरणावर मौन सोडत म्हणाला, “जोपर्यंत अशा बातम्या देणारे लोक जिवंत आहेत, तोपर्यंत अशा खोट्या अफवा सुरूच राहतील. ज्या दिवशी माझ्यावर हात उचलणाऱ्याचा जन्म होईल, त्या दिवशी कलियुग संपेल."

एल्विशच्या या प्रतिक्रियेवर त्याच्या चाहत्यांनी त्याला समर्थन दिले.

काय होतं नेमकं प्रकरण?

एल्विश त्याचा मित्र आणि निर्माता राघवसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेला. व्हायरल व्हिडिओमध्ये एल्विश आणि राघवच्या आसपास गर्दी दिसतेय. काही लोक त्याला कॉलर धरून ओढतानाही दिसत आहेत.

टाईम्स नाऊ डिजिटलच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनी नकार दिला. यामुळे त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली, तर एल्विश मात्र तिथून पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.