Elvish Yadav Controversy : फक्त सापांची तस्करी करुन थांबला नाही, तो आहे भलताच 'उद्योगी'! एल्विशच्या भोवतीचे वाद माहितीये?

बिग बॉस ओटीटी च्या दुसऱ्या सीझनमध्ये विजेता ठरलेल्या एल्विशच्या भोवती वाद ही काही नवी गोष्ट नाही. यापूर्वी देखील तो वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Elvish Yadav Youtuber Controversy snake smuggling
Elvish Yadav Youtuber Controversy snake smugglingesakal
Updated on

Elvish Yadav Youtuber Controversy snake smuggling : प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्यानं जे काही केल आहे ते भलतेच भयानक आहे. कोब्रा जातीच्या सापांची तस्करी करुन त्यांच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.

बिग बॉस ओटीटी च्या दुसऱ्या सीझनमध्ये विजेता ठरलेल्या एल्विशच्या भोवती वाद ही काही नवी गोष्ट नाही. यापूर्वी देखील तो वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दुसऱ्या सेलिब्रेटींनी ट्रोल करणे त्यांच्याविषयी अपशब्द वापरुन सोशल मीडियावर व्हिडिओ ट्रोल करणे यामुळे तो वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. तऱ्हेवाईक गोष्टी करुन लाईक्स आणि कमेंटच्या अधीन गेलेल्या एल्विशनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.Elvish Yadav Youtuber Controversy snake smuggling

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप आणि उत्तर भारतात धक्के असं का?

रेव्ह पार्टीचे आयोजन करणे आणि विषारी सापांची तस्करी यामुळे एल्विशवर गुन्हा दाखल झाला असून त्याला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी करण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावर एल्विशशी संबंधित वेगवेगळ्या वादांची चर्चा होत आहे. त्यातील काही वादांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

गुडगावमधून गायब झालेल्या कुंड्या....

२०२३ मध्ये गुडगावमधून एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे दिल्ली गुडगाव हायवेवर ज्या वेगवेगळया रोपांच्या कुंड्या ठेवल्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. जी २० साठी जे पाहुणे भारतात येणार होते त्यांच्या स्वागताची तयारी म्हणून प्रशासनानं हे सुशोभिकरण केले होते. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा काही कुंड्या ठेवल्या होत्या. मात्र या कुंड्या चोरीला गेल्या. एका एसयुव्ही मधील व्यक्तीनं त्या कुंड्या चोरल्याचे दिसून आले होते. अनेकांनी ती कार एल्विशची आहे असे सांगितले होते.

सलमानला म्हणाला क्रिमिनल...

एल्विशनं बॉलीवूडचा भाईजान सलमानशी देखील पंगा घेतला आहे. २०१९ मध्ये त्यानं एका व्हिडिओमधून सलमानची बदनामी केली होती. सलमानला बॉलीवूमध्ये अनेकजण घाबरतात. त्यानं विवेक ऑबेरॉयचे करिअर संपवले. मात्र कुणीच त्याला काही बोलले नाही. त्यानं फक्त अभिनेत्रींनाच ब्रेक दिला. अशा शब्दांत सलमानवर टीका केली होती.

Elvish Yadav Youtuber Controversy snake smuggling
Elvish Yadav : एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यावर कसा? विरोधकांच्या आरोपांवर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

ध्रुव राठीसोबतचा वाद आला होता चर्चेत...

एल्विशनं ध्रुव राठीवर देखील आरोप केला होता. तो भारत सरकारच्या विरोधात आहे असे त्यानं म्हटले होते. त्यानं ध्रुवच्या एका व्हिडिओमधील काही क्लिप्स एडिट करुन त्याचा व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर एल्विशवर खूपच टीकाही झाली होती. एल्विशनं ध्रुवच्या फॉलोअर्सला भडकावल्याचेही बोलले जात होते.

Elvish Yadav Youtuber Controversy snake smuggling
UT 69 Twitter Review : 'मी नाही त्यातला अन्....' प्रेक्षकांनी 'युटी ६९' पाहिल्यावर राजला धारेवर धरला!

स्वरानं थेट केली होती एफआयआर...

२०२१ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न एल्विशनं केला. असा आरोप स्वरानं त्याच्यावर केला होता. ते प्रकरण खूपच चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.