Elvish Yadav : एल्विशच्या 'त्या' पार्टीत खरचं काय चालायचं? राहुलच्या 'डायरी'तून समोर येणार खळबळजनक खुलासे!

राहुल सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. राहुल हा तोच व्यक्ती आहे ज्याचा व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावरुन समोर आला होता.
Elvish Yadav Controversy
Elvish Yadav Controversyesakal
Updated on

Elvish Yadav Youtuber Snake Venon Case UP Police : बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश हा सापांची तस्करी प्रकरणात चर्चेत आला आहे. त्यानं त्या रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा नशेसाठी वापर केल्याचा आरोपही एल्विशवर आहे. हे सगळं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आलं असून आता राहुलच्या डायरीनं मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राहुलच्या डायरीतून होणार मोठे खुलासे....

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या त्या डायरीमध्ये अनेकांची नावं आहेत. त्यामध्ये गुरुग्राममध्ये झालेल्या पार्टीचा देखील उल्लेख आहे. पोलिस आता त्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेताना दिसत आहे. याबरोबरच पोलीस त्या व्हिडिओच्या देखील शोधात आहे. डायरीतील नोंदीनुसार राहुलनं एका तिसऱ्या व्यक्तीला देखील फोन केला होता. आता ती व्यक्ती कोण हे शोधून काढणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. याबरोबरच राहुल आणि एल्विशचे काय बोलणे झाले होते हे देखील पोलिसांना शोधायचे आहे.

राहुल सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. राहुल हा तोच व्यक्ती आहे ज्याचा व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावरुन समोर आला होता. राहुलनेच आपण एल्विशला ओळखतो असे सांगितले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस राहुल आणि एल्विशला समोरासमोर बसवून चौकशीसाठी बोलावून घेणार आहे.

यापूर्वी नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ मध्ये एका रेडमध्ये कोब्रा जातीचे साप आणि त्यांचे विष जप्त केले होते. राहुलकडे पोलिसांना २० मिली सापाचे विष मिळाले. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची बातमी समोर आली होती. त्यात युट्युबर एल्विशचं नाव उजेडात आल्यानं त्याकडे हायप्रोफाईल केस म्हणून पाहिले गेले. ती एक रेव्ह पार्टी होती. आणि त्या प्रकरणात आतापर्यत पाच लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत.

सापांची तस्करी प्रकरणात एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यात त्यानं म्हटले होते की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. जे काही माझ्या विरोधात सुरु आहे त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही. सगळा खोटेपणा आहे. आणि त्यात माझे नाव जाणीवपूर्वक घेतले जात आहे. असे एल्विशचे म्हणणे होते.

मी युपीच्या पोलिसांना हवे ते सहकार्य करण्यास तयार आहे. मी युपी पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, जर माझ्या विरोधात तुम्हाला कुठलाही पुरावा आढळल्यास मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण कुठल्याही पुराव्या अभावी माझी बदनामी करु नका. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. असे आवाहन एल्विशनं केले आहे.

Elvish Yadav Controversy
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

जे प्रकरण समोर आले आहे त्यात माझा कोणताही वाटा नाही. मला त्यात गोवण्यात आले आहे. मीडियानं माझे नाव त्यात समोर आणून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी तपास यंत्रणांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यात तयार आहे. असे देखील एल्विशनं त्याच्या एका व्हिडिओतून सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.