सोनाली बेंद्रे पुन्हा US च्या 'त्या' कॅन्सर रुग्णालयात,भावूक होत म्हणाली...

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2018 मध्ये Metastatic Cancer झाल्याचं तिन ट्वीट करत सांगितलं होतं.
Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hope
Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hopeGoogle
Updated on

गेल्या काही दिवसांत कॅन्सरनं(Cancer) इतक्या गुणी कलाकारांना गिळलंय की आता कुणा कलाकारानं त्याचं नाव जरी घेतलं तरी पुढं ऐकायचं धाडसच राहत नाही. इऱफान खान आणि Rishi Kapoor हे दोन दिग्ग्ज कलाकार कॅन्सरचेच बळी ठरले. त्यांच्या बऱ्या झालेल्या कॅन्सरनं डोकं वर काढलं अन् सगळं संपवलं. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली बेंद्रे(Sonali bendre) हिला देखील २०१८ मध्ये कॅन्सर झाला,तेव्हा तिनं पोस्ट करुन आपल्या चाहत्यांपर्यंत ते पोहोचवलं होतं. कॅन्सरशी दोन हात करुन सोनाली त्यातनं बरी झाली आणि आता ती आपल्या कामात व्यस्त देखील आहे. पण आता पुन्हा ती अमेरिकेत गेलीय,आणि तिथे कॅन्सर ट्रीटमेंट घेतलेल्या त्याच हॉस्पिटलला तिनं भेट दिल्याचं म्हटलं आहे. हे ऐकून तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला आहे. काय कारण की सोनाली पुन्हा तिथे गेली,पुन्हा काहीतरी? नको कशाला ते वाईट विचार. चला नेमकं का गेलीय सोनाली तिथे ते जाणून घेऊया.(Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hope)

Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hope
Heart Attack च्या अफवेवर भडकला अपरिचित फेम विक्रम; म्हणाला,'आता छातीवर...'

सोनालीनं ठरवलं की पुन्हा जिथं आपल्याला जीवनदान मिळालं,दुसरा जन्म मिळाला त्या कॅन्सरची ट्रीटमेंट घेतलेल्या हॉस्पिटलला भेट द्यायची. रुटीनं चेकअप हा एक व्हिझिट देण्याचा हेतू असू शकतो,पण तसं तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलेलं नाही. सोनालीनं हॉस्पिटल मधील वेटिंग रुममध्ये फोटो क्लीक करत तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच ठिकाणी सोनालीनं कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी दोन हात केले आणि लढा जिंकत बरी होऊन ती स्वदेशी म्हणजे भारतात परतली होती.

सोनालीनं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''ही खूर्ची,हा व्ह्यू,आणि हिच ती जागा...४ वर्षांपूर्वी. इथेच बसून अनुभवली निव्वळ दहशत आणि इथेच मनात जागला आशेचा किरण..खूप काही बदललं आणि खूप काही अजूनही तसंच आहे. या जागी बसून रुग्णांना डॉक्टरच्या केबिनमध्ये जाताना पाहणं..सगळं झपकन नजरे समोरुन गेलं. माझ्यासाठी तो प्रवास खूप कठीण होता. सगळं काही आज पुन्हा पाहिलं,तिच केमोथेरपीची रुम,तोच वेटिंग रुम,आता फक्त चेहरे वेगळे...'' सोनालीनं खूप भावूकतेने आपल्या कॅन्सरशी झालेल्या लढ्याचा तो काळ पोस्टमधून मांडला.''मला फक्त कॅन्सर रुग्णांना एवढंच सांगावस वाटतं की हे सगळं फक्त आशेवर अवलंबून असतं. ती आशा जेव्हा तुमची डळमळेल तेव्हा फक्त माझ्याकडे एकदा पहा,मी तिथे तुमच्या दुसऱ्या बाजूला दिसेन. माझ्यासाठी मी कॅन्सर मुक्त झाले हे कळलं तो दिवस खूप भावूक होता,गोड होता...आनंदाच्या जेवढ्या व्याख्या तुम्हाला माहित असतील तेवढ्या त्या दिवसाला लागू होतात. मी जेव्हा इथून बाहेर पडले,माझ्या मुलाच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज होतं आणि मी माझ्याबाबतीत चमत्कार करणाऱ्या त्या दैवी शक्तीला मनोमन धन्यवाद देत होते''.

Emotional Sonali Bendre visits cancer hospital where she was treated, says, “From sheer terror to continued hope
केएल राहुल सोबत लग्न? अथिया शेट्टीने चुप्पी तोडत दिलं धक्कादायक उत्तर

सोनालीनं २०१८ मध्ये आपल्याला Metastatic Cancer झाल्याचं ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं होतं. तेव्हा देखील तिनं अशीच भावूक पोस्ट केली होती. त्यानंतर ती अमेरिकेत गेली,तिच्यावर तिथे यशस्वी उपचार झाले आणि आता ती तिचं आयुष्य उत्तमरित्या जगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.