Emraan hashmi surprised by kangana ranaut nepotism : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आगामी शो टाईम नावाच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आला आहे. त्या निमित्तानं तो प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. अशातच त्यानं कंगनानं (Kangana Ranaut) त्याच्याविरोधात जी काही वक्तव्यं केली होती त्यावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे.
शो टाईम या मालिकेच्या निमित्तानं इम्रान फिल्म विश्वातील अशा गोष्टींना (Latest Bollywood News) उजेडात आणणार आहे ज्या बऱ्याचशा प्रेक्षकांना, चाहत्यांना माहिती नाहीत. बॉलीवूडमध्ये काय चालते, लोकांना भलेही या दुनियेचे आकर्षण असेल पण पडद्यामागे घडणाऱ्या अनेक घटना हा चित्रपट आपल्यासमोर ठेवतो. अशी ही मालिकेची थीम आहे. असे बोलले जात आहे. नेपोटिझम सारख्या महत्वाच्या विषयावर देखील या मालिकेतून भाष्य केले गेले आहे.
या सगळ्यात इम्रान हाश्मीनं बॉलीवूडमधील नेपोटिझमवर प्रतिक्रिया दिली (Emraan Hashmi Latest News) आहे. त्यात त्यानं सुरुवात कंगनापासून केली. कंगनानं यापूर्वी तिच्या अनेक मुलाखतींमधून बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील नेपोटिझम यावर सणकून टीका केली आहे. त्यात तिनं अनेक बडया कलाकारांची नावं घेऊन कशाप्रकारे बॉलीवूडमध्ये घराणेशाही चालते यावर प्रतिक्रिया दिली होती. कंगनानं जी प्रतिक्रिया दिली होती ती खूपच टोकदार होती. असे इम्राननं म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील नेपोटिझम हा चर्चेचा मुख्य मुद्दा राहिला आहे. त्यावर अनेकांना त्यांच्या प्रतिक्रिया देत तो मुद्दा महत्वाचा नसून अभिनयाची क्षमता जास्त महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले आहे. यात इम्राननं कंगनाची स्तुती केली पण याशिवाय तिनं जी काही मतं नेपोटिझमवर व्यक्त केली होती त्यावरुन तिच्यावर टीकाही केली आहे. तो म्हणतो, एक कलाकार म्हणून कंगना माझी आवडती अभिनेत्री आहे. तिला काही वेगळे अनुभव आले असतील म्हणून तिची प्रतिक्रिया वेगळी असेल.
मी तिच्या सोबत गँगस्टर चित्रपटामध्ये काम केले होते. ज्यात माझ्यापेक्षा तिचा रोल हा जास्त महत्वाचा होता. त्या चित्रपटामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. त्यामुळे मला असे वाटत नाही की घराणेशाहीमुळे तुम्हाला भूमिका मिळतात आणि तुम्ही यशस्वी होता. या सगळ्यात कंगनाची भूमिका वेगळी असेल. पण याचा अर्थ सगळी इंडस्ट्रीच याला जबाबदार आहे. असे होत नाही. इंडस्ट्रीमध्ये सगळीच लोकं ही काही कोणत्या नशेच्या आहारी गेलेली नाहीत. अशा शब्दांत इम्राननं त्याची भूमिका मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.