Dharma Censor Board : चित्रपटांवरही आता धर्माचा 'वॉच' ; पठाणच्या पार्श्वभूमीवर धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना

Dharma Censor Board
Dharma Censor Board
Updated on

Dharma Censor Board : भावना दुखावल्याचे प्रकरणे भारतात नवे नाहीत. आता प्रयागराजमध्ये धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. पठाण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. चित्रपट व वेबसिरीजवर आता धर्म सेन्सॉर बोर्डाचा वॉच असेल.

हिंदू देवी-देवतांचा अपमान रोखण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माघ मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या संतानी धर्मा सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. चित्रपट व वेबसिरीजमध्ये देवी-देवतांचा अपमान होऊ नये. यावर आता धर्म सेन्सॉर बोर्ड लक्ष ठेवणार आहे.

Dharma Censor Board
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्षपद सोडणार? निवडणूक आयोगाने...

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती या धर्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असतील. या सेन्सॉर बोर्डात १० सदस्यांचा समावेश असेल. बोर्डाकडे आलेल्या तक्रारी संबंधित चित्रपट आणि वेबसिरजीची हे बोर्ड पाहणी करेल.

Dharma Censor Board
मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...

या चित्रपटात हिंदू देवतांचा अपमान झाला असल्यास तो चित्रपट, त्याची निर्मिती आणि प्रदर्शन तातडीने थांबवण्यात येईल. पठाण चित्रपटातील दिपीकाच्या भगव्या बिकनी वरुन सुरू असलेला वाद ताजा असताना हा बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. 

Dharma Censor Board
Ajit pawar : राजकारणातील मग्रुरी अजितदादांनी अनेकदा दाखवलीच; भाजपच्या बड्या नेत्याची जहरी टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.