Anupam Kher Emotional Post of Tarek Fateh News: पाकिस्तानी अन् कॅनेडिअन प्रसिद्ध लेखक आणि स्तंभलेखक तारेक फतेह यांचं सोमवारी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं.
बऱ्याच काळापासून तारेक कॅन्सरशी झुंज देत होते, अखेर कॅनडातच त्यांची प्राणज्योत मालवली.
फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी ट्विटद्वारे दिली. तारेक फतेह मूळचे पाकिस्तानचे.
परंतु त्यांनी पाकिस्तानच्या वाईट गोष्टींवर आणि भ्रष्ट कारभारावर स्पष्ट शब्दात टीका केली आहे. तारेक फतेह यांच्या निधनानंतर त्यांचा मित्र आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर भावुक झाले आहेत.
(Even living in Pakistan, you are an true Indian.. Anupam Kher mourns the death of Tarek Fateh)
हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अनुपम खेर यांनी तारेक फतेहसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
अनुपम त्याचा मित्र तारेकसोबत वेळ घालवताना दिसत आहे आणि दोघेही हलके-फुलक्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. तारेक भारतात मनसोक्त फिरायचा पण तो कॅनडात राहत होता.
अनुपमने तारेकसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये तारेक यांची त्याची पत्नी नर्गिस टपलही दिसत आहे. हा फोटो तारेक फताह यांच्या घराचा आहे जिथे अनुपम खेर त्यांना भेटायला आले होते.
अनुपम खेर यांनी हे फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले - एक सच्चा भारतीय, एक निर्भीड आणि निर्मळ हृदयाचा माणूस आणि माझा प्रिय मित्र तारेक फतेह यांच्या निधनाने मला दु:ख होत आहे. तो प्रचंड धाडसी होता. त्याचे हसणे अस्सल होते.
आम्ही अनेक प्रसंगी भेटलो आहोत. पण टोरंटो येथील त्याच्या घरी एक सुंदर दुपार घालवणे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांबद्दल काही उत्तम कथा जाणून घेणे रंजक होते. अशी पोस्ट अनुपम खेर यांनी केलीय.
भारतातील हिंदुत्ववाद्यांमध्ये तारेक प्रसिद्ध होते. आपल्या वादग्रस्त विधानांमुळं ते अनेकदा चर्चेत राहिले. पण मुस्लिमांवर टीकात्मक विधानं आणि लिखाणामुळं ते हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रसिद्ध पावले. फतेह यांनी आपल्या ट्विटरवर लिखाण करत अनेकदा वाद ओढवून घेतले होते.
एका मुस्लिम धर्मगुरुला आपली हत्या करायची होती, असा आरोप करत तारेख फतेह यांनी कोलकाता पोलिसांना नपुंसक असं संबोधलं होतं.
तसेच मुस्लिम लोक गुगलमध्ये काम करत असून त्यांनी आपला ईमेल सस्पेंड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
एकूणच तारेक यांच्या निधनाने एक निर्भीड माणूस आपल्यातून गेल्याची खंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.