Exclusive : 'जयललितांनी फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली, मी देखील...'- कंगना

27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता अँड पिक्चर्स वाहिनीवर ‘थलैवी’ चित्रपटाचा प्रीमिअर प्रसारित होणार
Kangana Ranaut
Kangana Ranaut sakal
Updated on

आपल्या लोकांसाठी संघर्ष करणार्‍्या इतिहासातील एका अत्यंत प्रभावशाली राजकीय नेत्याच्या व्यक्तिरेखेमुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. कारण येत्या 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता अँड पिक्चर्स वाहिनीवर ‘थलैवी’ चित्रपटाचा प्रीमिअर प्रसारित होणार आहे. या चित्रपटात भूमिका साकारतानाच्या अनुभवावर प्रकाश टाकताना प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावतने जयललिता यांची देहबोली साकारतानाचा आणि या भूमिकेकडे पाहण्याचा आपला अनुभव व्यक्त केला.

‘थलैवी’ चित्रपटात भूमिका रंगविण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

‘थलैवी’ हा माझ्यासाठी एक जीवन बदलून टाकणारा अनुभव होता, कारण मला त्यातून खूप काही शिकता आलं. जया अम्मा यांच्यासारख्या एका अतिशय लोकप्रिय आणि प्रभावी नेत्याची भूमिका मला साकारण्याची संधी मिळणं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा होती. जयललिता या एक प्रभावशाली नेत्या होत्या आणि त्यांच्या राजकीय भूमिकेमागे एक हेतू होता. आपल्या राज्यातील जनतेसाठी त्यांनी सतत संघर्ष केला. त्यांची अंगकाठी आणि देहबोली आत्मसात करण्यासाठी पडद्यामागे मला खूप काम करावं लागलं. चित्रपटात त्या टीनेजर असल्यापासून चाळीशीपर्यंतचा त्यांचा प्रवास रेखाटण्यात आला आहे आणि या काळातील त्यांच्या शरीरात झालेले बदल आत्मसात करणं हेच एक मोठं आव्हान होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक, विजयसरांचा माझ्यावर ठाम विश्वास असल्यामुळेच मी या बदलांना सामोरी गेले आणि थलैवी बनले. मी हा चित्रपट स्वीकारला याचा आता मला खूप आनंद होत आहे.

तू केलेलं जयललिता यांचं चित्रण यथार्थ आहे. पण त्यांच्या मनातील विचारप्रक्रिया समजून घेणं आणि त्यांची देहबोली आत्मसात करणं हा प्रवास कसा होता?

मी जेव्हा एखादी भूमिका स्वीकारते, तेव्हा मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय मिळेल, याची खबरदारी घेते. मी त्यांच्या व्यक्तिरेखेचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा आणि त्यांच्या एकंदरच व्यक्तिमत्त्वाचा खूप जवळून अभ्यास केला आणि तो माझ्या कामगिरीत बिंबवला. जयललिता यांच्या अंगात अनेक गुण आणि कला होत्या, त्यातील एक म्हणजे त्यांनी शास्त्रीय नृत्याचं शिक्षण घेतलं होतं. त्या एक व्यावसायिक नृत्यांगना होत्या. त्यांचा हा गुण माझ्या व्यक्तिरेखेत उतरविणं हेही एक मोठं आव्हान होतं. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याच्या वाटचालीतील प्रत्येक क्षण माझ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनयगुण बाहेर आणत होता आणि मला माझ्यातील या गुणांची जाणीव त्यापूर्वी कधी झाली नव्हती.

कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला सामोरं जाताना तू जयललिता आणि तुझ्यातील समांतर गोष्टी आठवतेस का?

या चित्रपटाचं चित्रीकरण करीत असताना दर दिवशी मी अधिकाधिक जया अम्मांशी एकरूप होत होते. मला त्यांच्याबद्दल इतकी आणि इतकी सखोल माहिती मिळाली. आपल्या जीवनात आपल्यासमोर आव्हानं उभी राहतात आणि ती आपला कस पाहतात. अशा वेळी त्यांच्यासारख्या व्यक्तिरेखेची माहिती असणं ही खूप मोलाची बाब आहे. कारण जया अम्मा यांना किती प्रचंड संकटांचा सामना करावा लागला होता आणि त्यातून त्यांनी फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली. आजही कोणत्याही परिस्थितीत मी स्वत:ला त्यांच्या जागी ठेवते आणि त्यामुळे माझा निश्चितच खूप विकास झाला आहे- वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावरही.

एमजीआरच्या भूमिकेतील अरविंद स्वामीबरोबर भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता?

एक व्यक्ती म्हणून अरविंदसर हे खूपच उदार आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे आहेत. ते तुम्हाला तुमची भूमिका साकारण्यात मदत करतात. त्यांनी एमजीआर यांची व्यक्तिरेखा इतक्या अप्रतिम सफाईने साकार केली आहे की खरे एमजीआर आणि अरविंदसर यांच्यात फरक करणं खूप अवघड आहे. पडद्यावर ते अनेकदा उत्स्फूर्तपणे व्यक्त होतात, हे मी पाहिलं आहे. मला त्यांची ही गोष्ट मनापासून पटते कारण मीसुध्दा कोणताही प्रसंग उभा करताना फारसे टेक देत नाही. आमच्या या समान सवयीमुळे चित्रपटाचं चित्रीकरण करणं अगदी सुरळीत तर झालंच, पण त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजाही आली. चित्रीकरणादरम्यान त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली तेव्हा ते एक खरोखरच खूप सज्जन व्यक्ती आहेत, याची मला जाणीव झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.