Fahadh Faasil Pushpa 2 Birthday : भारतात आजच्या घडीला त्याच्यासारखा दमदार व्हिलन आहे कुठे?

फहाद हा अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता आहे.
Fahadh Faasil Birthday
Fahadh Faasil Birthday esakal
Updated on

Fahadh Faasil Birthday : भारतीय चित्रपट विश्वामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या फहाद फासिलच्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुष्पामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसलेल्या फहादचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

फहादचा मुद्राभिनय हा नेहमीच कौतूकाचा विषय राहिला आहे. त्याचे डोळे, त्याचे हावभाव आणि त्याची संवादशैली तर प्रेक्षकांच्या खास प्रतिक्रियेचा विषय असतो. त्यानं मारी सेल्वराजच्या मन्मनमध्ये जी भूमिका साकारली आहे त्याच्यावर तर कौतूकाचा पाऊस पडतो आहे. फहाद हा अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता आहे. त्यानं आतापर्यत त्याच्या वाटेला आलेल्या भूमिकांचे सोने केले आहे. त्याला न्याय दिला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वयाची ४१ वर्ष पूर्ण करुन ४२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. अनेकांना माहिती नसेल पण त्यानं सात वर्षांनी चित्रपट विश्वामध्ये कमबॅक केले होते. यावेळी त्यानं पुष्पामध्ये भवर सिंह शेखावत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ती भूमिका फहादनं ज्याप्रकारे साकारली त्यामुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला. प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांमध्ये त्याचे नाव येऊ लागले.

पुष्पामध्ये अल्लू अर्जूनला प्रत्येकवेळी आव्हान देऊन आपली स्वताची वेगळी ओळख त्या भूमिकेतून तयार करणाऱ्या फहादवर प्रेक्षकांनी स्तुतीसुमनं उधळली होती. याचे दुसरे कारण म्हणजे पुष्पामधून अल्लु अर्जूननं पूर्णपणे त्याची छाप उमटवल्यावर आणखी कुणाची डाळ शिजणार नव्हती. मात्र फहाद त्याला अपवाद होता. त्यानं साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पुष्पाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.

Fahadh Faasil Birthday
Kangana Ranaut On Oppenheimer: 'भगवद्गीतेचा तो सीन खुप आवडला' ओपेनहायमर पाहिल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया चर्चेत

केवळ साऊथच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील फहादनं त्याची वेगळी ओळख तयार केली आहे. आतापर्यत त्याला तीनवेळा फिल्मफेयर आणि एकदा नॅशनल अवॉर्डनं गौरविण्यात आले आहे. फवादनं वयाच्या विसाव्या वर्षी त्याच्या वडिलांची फिल्स कैयेथुम दोरथ मधून चित्रपट विश्वात पाऊल ठेवले होते. तो चित्रपट फ्लॉप झाला होता.

Fahadh Faasil Birthday
Gadar 2 : 'तुम्हाला हल्क, सुपरमॅन चालतो मग तारासिंगच्या नावानं पोटात का दुखतं? गदरच्या सनीचा प्रश्न

या चित्रपटानंतर तो सात वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब होता. तो पूर्ण तयारीनिशी कमबॅकच्या शोधात होता. अशात त्याची मृत्यूंजयम नावाची शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली आणि त्याला वेगळी ओळख मिळाली. २०११ मध्ये आलेल्या चप्पा कुरिशू मधूनही त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. २०१४ मध्ये बँग्लोर डेज नं तर फवादला खूपच मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()