Fake News About Kannada Actor Divya Spandana: कन्नड अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी काही तासांपुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच चाहत्यांना धक्का बसला. त्यांनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली.
मात्र आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री दिव्या स्पंदना हिच्या मृत्यूची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचं बोललं जात आहे.
एका पत्रकाराने दिव्या स्पंदना जिवंत असून ठिक असल्याचा दावा केला आहे. त्या निरोगी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ही बातमी शेयर करतांना त्या पत्रकाराने अभिनेत्री आणि राजकारणी दिव्या स्पंदना यांच्यासोबत झालेल्या ताज्या भेटीचा फोटो देखील शेअर केला आहे. पत्रकाराने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मी नुकतेच दिव्या स्पंदनाशी बोलली आहे.
त्या ठीक आहेत आणि उद्या बंगळुरूला परतणार आहे. हे केवळ पत्रकाराने शेयर केलेले ट्विच आहे मात्र अद्याप स्वत: अभिनेत्री दिव्या स्पंदना यांनी किंवा त्याच्या टिमने देखील याबद्दल काही अधिकृत माहिती दिलेली नाही.
29 नोव्हेंबर 1982 रोजी जन्मलेल्या दिव्या स्पंदनाला यांना ऑनस्क्रीन रम्या म्हणून ओळखले जाते. त्या एक लोकप्रिय अभिनेत्रा आणि एक प्रमुख राजकीय व्यक्ती देखील आहे. त्या कर्नाटकातील मंड्याचे प्रतिनिधीत्व करत लोकसभेत खासदार पद सांभाळतात.
त्यांनी अनेक तमिळ चित्रपट केले आणि आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार, उदय पुरस्कार आणि कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काही दिवसांपुर्वीच लोकसभेच्या माजी सदस्या आणि कन्नड मधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या दिव्या यांना आत्महत्येचे विचार येत होते.
त्या गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या विचारांशी लढत होत्या मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांनी भावनिक पाठिंबा दिल्याने त्यांना काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या सोशल गेमला पुढे नेण्याचे श्रेय देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.