Falguni Pathak Dandia Pass : फाल्गुनीच्या दांडिया कार्यक्रमाचा पास देतो असे सांगून १५६ युवकांना गंडा, ५ लाखांची फसवणूक

प्रसिद्ध सेलिब्रेटी फाल्गुनी पाठकच्या दांडिया कार्यक्रमाचे पास देतो असे सांगून तब्बल १५६ युवकांची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.
Falguni Pathak Dandia Navraatri Mumabai Boriwali
Falguni Pathak Dandia Navraatri Mumabai Boriwaliesakal
Updated on

Falguni Pathak Dandia Navraatri Mumabai Boriwali : प्रसिद्ध सेलिब्रेटी फाल्गुनी पाठकच्या दांडिया कार्यक्रमाचे पास देतो असे सांगून तब्बल १५६ युवकांची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. या फसवणूकीत ५ लाखांना त्या तरुणांना गंडा घालण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाच पुढील तपास पोलीस करत आहेत. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असून त्यानिमित्तानं गरबाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. फाल्गुनी पाठक ही गरबा सेलिब्रेटी म्हणून गेल्या काही वर्षांपासून ओळखली जाते. प्रसिद्ध गायिका असणाऱ्या फाल्गुनीच्या गरबा कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. आता या कार्यक्रमाच्या दरम्यान तरुणांची फसवणूक झाल्यानं चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी फाल्गुनी पाठक यांच्या दांडिया कार्यक्रमाचे आयोजक आणि तिकीट डिलर विशाल शहा यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, मुंबईतील बोरिवली वेस्टमध्ये दांडिया कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ३ हजार ३०० हा किमान तर ४ हजार ५०० अशा मोठ्या किंमतीचे पास ठेवण्यात आले आहेत. एक तरुण आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी काही जणांकडून जास्त पैसे घेऊन त्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश देण्याचे अमिष दाखवले होते.

त्या तरुणांनी बाकींच्याकडून पैसे घेऊन १५६ पास देण्याचे कबूलही केली होती. मात्र त्यानंतर पास न मिळाल्यानं संबंधित तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. एका वीस वर्षीय तरुणानं याबाबत कांदिवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Falguni Pathak Dandia Navraatri Mumabai Boriwali
Asha Preakh On Kangana : 'तिला फार कळतं का'? ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी टोचले कंगनाचे कान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.