Satish Kaushik: आता आम्ही पुढचं आयुष्य कसं जगायचं? सतीश यांच्या कुटुंबियांना शोक अनावर..

सतीश कौशिक यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय शोकाकुल झाले आहे.
family reaction on Satish Kaushik death get emotion
family reaction on Satish Kaushik death get emotionsakal
Updated on

Satish Kaushik : बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते केवळ 66 वर्षांचे होते. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.

सतीश कौशिक आणि अभिनयासोबत दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटात अभिनय तर 20 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. बॉलीवुडमध्ये त्यांची दोस्ती यारी मोठी आहे. त्यांच्या आनंदी आणि गोड स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर दिला.

(family reaction on Satish Kaushik death get emotion)

family reaction on Satish Kaushik death get emotion
Bharat Ganeshpure Mother Dies: 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन..

कौशिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी केवळ 11 वर्षांची लहान मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा मोठं आधार गेला आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची भाची अनिता शर्मा यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी त्या भावूक होत म्हणाल्या, 'सतीशला पुन्हा आपल्यात आणू शकले असते तर बरं झालं असतं… तो भावडांमध्ये लहान होता. त्याला मोठा भाऊ आणि बहीण आहे. शिवाय त्याची मुलगी लहान आहे. आता ते पुढचं आयुष्य कसं जगतील? त्याने लोकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं होतं. देव चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो'.

सतीश कौशिक यांचे निधन हृदयविकाराचा झटक्याने झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात तसे नमूद करण्यात आले आहे. सतीश कौशिक यांच्या मृतदेहावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()