Mohan Maharishi: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार मोहन महर्षी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये गणले जाणारे दिग्दर्शक मोहन महर्षी यांचे निधन झाले आहे
Mohan Maharishi, Mohan Maharishi news, Mohan Maharishi passed away
Mohan Maharishi, Mohan Maharishi news, Mohan Maharishi passed awaySAKAL
Updated on

Mohan Maharishi Passed Away News: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये गणले जाणारे दिग्दर्शक मोहन महर्षी यांचे निधन झाले आहे. ते प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते आणि नाटककार होते. मोहन महर्षी यांच्या निधनाची पुष्टी अभिनेता पंकज झा कश्यप यांनी सोशल मीडियावर केली आहे.

(famous bollywood ani indian theatre director mohan maharishi passed way at the age of 83)

मोहन महर्षी यांच्या निधनाची माहिती अभिनेता पंकज झा कश्यप यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानुसार महर्षी यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. रंगमंचावर सहा दशकांहून अधिक काळ घालवणाऱ्या महर्षींचे जाणे ही कलाविश्वाचं कधीही न भरून येणारं नुकसान आहे. मोहन महर्षी यांनी भारतीय रंगभूमीला दिलेलं योगदान अमूल्य आहे.

Mohan Maharishi, Mohan Maharishi news, Mohan Maharishi passed away
Robert De Niro: गॉडफादर पुन्हा झाला फादर ! ७९ व्या वर्षी बनला सातव्या मुलाचा बाप

ऑल इंडिया रेडिओ मधून झालेली सुरुवात:

१९५५ मध्ये मोहन महर्षींनी ऑल इंडिया रेडिओमधून करिअरला सुरुवात केली. त्यामुळे तेथे त्यांनी 1965 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला आणि 1983 ते 1986 या काळात ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक झाले. त्यांना दिग्दर्शन क्षेत्रात 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

Mohan Maharishi, Mohan Maharishi news, Mohan Maharishi passed away
Adipurush Trailer Launch: प्रभास हा प्रभू श्रीरामासारखा साधा - सरळ माणूस.. क्रितीने प्रभासबद्दल काढले कौतुकाचे शब्द

मोहन महर्षी त्यांच्या क्रांतिकारी नाटकांसाठी ओळखले जात होते, ज्यात आइन्स्टाईन (1994), राजा की रसोई, विद्यामा आणि सानप पेडी यांचा समावेश होता. याशिवाय त्यांनी अंधयुग, राणी जिंदन (पंजाबी), ऑथेलो, मदर या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. याशिवाय त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोजमध्येही काम केले होते. यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांची भूमिका साकारली होती. मोहन महर्षी यांच्या जाण्याने भारतीय रंगभुमी आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.