Muzaffarnagar singer farmani naaz cousin was stabbed : 'हर हर शंभू' गाण्याची गायिका फरमानी ही आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या नावाची क्रेझ आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. फरमानीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तिच्या चुलत भावाची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फनगरमधील जनपद येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी फरमानीच्या चुलत भावाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येची वार्ता कळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी फरमानीच्या भावाची बॉडी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
याप्रकरणी रतनपुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञांताविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशिरा खुर्शीद नावाच्या युवकावर तीन अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. खुर्शीद हा देखील युट्यूब सिंगर म्हणून लोकप्रिय होता. त्याच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो फरमानीचा चुलत भाऊ होता. खुर्शीदवर हल्ला झाल्यानंतर त्याला तातडीनं जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
खुर्शीदला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. काही दिवसांपूर्वी फरमानी ही हर हर शंभू नावाच्या गाण्यामुळे लोकप्रिय झाली होती. तिच्या त्या गाण्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तिची खूप चर्चाही झाली होती. फरमानीनं तर तिच्या समुहातील काही लोकांविरोधात बंड पुकारले होते.
फरमानीला देखील गाणं गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. तिचे म्हणणे होते की, जेव्हा माझे पती मला सोडून गेले होते तेव्हा मला विरोध करणारे कुठे गेले होते. त्या उलेमांवर माझा राग आहे. त्यांनी मुस्लिम या नावाखाली महिलांवर जाचक अटी लादल्या आहेत. त्या चूकीच्या असून महिलांनी नवं स्वप्न पाहायची नाही का, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नच करायचे नाहीत का, असे प्रश्न फरहानीनं विचारले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.