Har Har Shambhu Controversy: युट्युबने हटवलं गाणं,पकडली फरमानी नाझची चोरी!

हर हर शंभू गाण्याचा मूळ गीतकार जीतू शर्मा याच्या आक्षेपानंतर फरमानी नाझचं हर हर शंभू गाणं युट्यूब वरनं हटवण्यात आलं आहे.
Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal  lyricist objection
Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal lyricist objectionGoogle
Updated on

Har Har Shambhu: हर हर शंभू गाणं गाऊन चर्चेत आलेल्या फरमानी नाझ(Farmani Naaz) विषयी मोठी बातमी कानावर पडत आहे. फरमानी नाझच्या युट्युब(You Tube) अकाऊंटवरनं हर हर शंभू गाणं हटवलं गेलं आहे. नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे एवढं लोकप्रिय गाणं अचानक फरमानी नाझच्या युट्यूब चॅनेलवरनं हटवलं गेलं. चला,जाणून घेऊया. (Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal lyricist objection)

Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal  lyricist objection
'खोटं बोलण्याची हद्दच..', क्रिकेटर ऋषभ पंतचा अभिनेत्री उर्वशी रौतेलावर घणाघात

फरमानी नाझला माहित होतं की हर हर शंभू गाणं तिचं नाही पण तिनं याकडे दुर्लक्ष केलं. आता गाण्याचा मूळ गीतकार जीतू शर्माच्या आक्षेपानंतर तिला युट्युबवरनं गाणं हटवावं लागलं,कारण गाण्याच्या कॉपी राइट्सचे हक्क जीतू शर्माकडे आहेत. जर कोणत्याही व्हिडीओचे,कंटेटचे,फोटोचे कॉपी राइट्सचे हक्क कोणाकडे असतील तर ते कुणीही क्रेडिट न देता वापरु शकत नाही.

Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal  lyricist objection
Laal Singh Chaddha मध्ये दिसणार भारतातील तब्बल 11 ऐतिहासिक घटना, जाणून घ्या

हर हर शंभूचा मूळ गीतकार ओडिसात राहतो. त्याच्या वडीलांचे भाजीचे दुकान आहे. खूप गरीबीत जीतू शर्मानं दिवस काढले आहेत. परिस्थितीमुळे फक्त १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या जीतू शर्माची स्वप्न मात्र मोठी आहेत. लहानपणापासून गाण्याची आवड असल्या कारणाने त्याने २०१४ मध्ये युट्युब चॅनेल सुरु केले आहे. पण फरमानी नाझनं त्याचं गाणं गाऊन लोकप्रियता मिळवल्यावर त्याला साधं क्रेडिटही दिलं नाही हे त्याला खटकलं,आणि त्याविरोधात कारवाई करण्याचं त्यानं जाहीर केलं .

Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal  lyricist objection
Laal Singh Chaddha रिलीज झाल्यानंतर काही तासात आमिरला पुन्हा बसला झटका...

पावसाच्या रिमझीम सरींसोबत हर हर शंभू गाण्यानं देखील आपले सूर घराघरात बरसवले होते. या गाण्याला इतकं पसंत केलं गेलं की फरमानी नाझ यामुळे रातोरात स्टार झाली. फरमानीला यासाठी काही मुस्लिम कट्टरपंथियांनी धमकी देखील दिली होती,पण ती मात्र कोणाला न जुमानता, न घाबरता आपलं काम करत राहिली. खरंतर यात बातमी ही आहे की,ज्या गाण्याला गायल्यानंतर फरमानीला इतकी लोकप्रियता मिळाली,ते गाणं तिचं स्वतःचं गाणं नाहीच मुळी आणि तिची चोरी आता समोर आली आहे.

Farmani Naaz Har Har Shambhu Song remove from you tube after jeetu sharma, aorginal  lyricist objection
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती विषयी मुलगी अंकिताची मोठी अपडेट

फरमानी नाझला लोकप्रिय बनवणारं हर हर शंभू गाणं जीतू शर्मानं लिहिलं आहे,ज्याला त्यानं अभिलिप्सा पांडेच्या आवाजात रेकॉर्ड केलं होतं. एका हिंदी वेबसाईटशी बातचीत दरम्यान जीतू शर्मा म्हणाला होता की,त्याला फरमानी नाझनं आपलं गाणं गायलं यासंदर्भात काहीच तक्रार करायची नाही. पण फक्त तिनं त्याला गीतकार म्हणून क्रेडिट द्यायला हवं होतं,कारण त्यानं गाणं लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.