आज 18 जून आहे. महिन्याचा तिसरा रविवार सर्वत्र फादर्स डे म्हणुन साजरा केला जातो. आजचा हा दिवस वडिलांना समर्पित आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिला हिरो हे त्याचे वडिल. अनेक धडे तुम्ही वडीलाकडून घेत असतात. मुलाला प्रत्येक पावलावर साथ देणारे वडिल हे आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक शिकवतात.
आज, फादर्स डेच्या निमित्ताने, आम्ही काही बॉलिवूड चित्रपटांची यादी घेवुन आलो आहोत जे आजच्या या खास दिवशी तुम्ही वडिलांसोबत बसून नक्कीच पाहू शकतात. हे सिनेमे एकत्र पाहिल्यानंतर तुमच्या दोघांमधील नात आणखी घट्ट होईल यात काही शंकाच नाही.
1. दंगल
राष्ट्रीय कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट तुम्हाला खुप काही सांगून जातो. या चित्रपटात महावीर फोगट जरी एका रागट आणि कठोर वडिलांसारखा दिसत असला तरी तो त्याच्या मुलींना कुस्ती शिकवण्यासाठी त्याच्यावर अनेक बंधने लादतो. शेवटी त्यांच्या मेहनतीला यश येते आणि त्यांनी आपल्या मुलींना देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. महावीरच्या चारही मुलींचे एकमेकांशी अतिशय प्रेमळ नातं आहे. हा चित्रपट तुम्हाला आयुष्यातील वडिलांचं महत्व सांगून जातो.
2. दृश्यम्1-2
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम' या चित्रपटात वडील आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतो. मुलीचा हाताने खून झाल्यानंतर विजय सर्व पुरावे बारकाईने नष्ट करतो आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो.
3. छिछोरे
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा छिछोरे हा चित्रपट प्रत्येकाने एकदा नक्कीच पाहावा. वडील आणि मुलाचे नातं अतिशय उकृष्ट पद्धतिने या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
4. पिकू
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर यांच्या पिकू हा चित्रपट तुम्हाला खुप काही शिकवून जातो. या चित्रपटात दीपिका तिचे वडिल अमिताभ यांची आईप्रमाणे काळजी घेते. बाप-लेकीचं नातं या चित्रपटात खूप छान दाखवण्यात आले आहे. मिश्किल वडील, त्यांना सांभाळणारी त्यांची मुलगी, वडिलांचे आजारपण, त्यांच्याशी होणारा संवाद हे सारं मोठ्या खुबीनं पीकूमधून आपल्यासमोर येतं.
5.अंग्रेजी मीडियम
इरफान खान आणि राधिका मदान हे 2020 मध्ये रिलिज झालेल्या 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. बाप आणि मुलीचे नातं चित्रपटात खूप छान आणि भावनिक नातं आहे. यामध्ये एका वडिलांचा संघर्ष खूप छान दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट पाहिला नसेल तर फादर्स डेच्या निमित्ताने जरूर पाहा
6.पा:
2009 साली आलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रोजेरियाने पीडित मुलाची भूमिका साकारली होती. तर अभिषेक बच्चनने वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात बाप-लेकाचं एक भावनिक नातं अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
7. शिवाय
हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवाय या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याने अतिशय उत्तमरित्या लेकीच अन् बापाच नातं रंगवून सांगितलं आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. अजय व्यतिरिक्त सायशा सहगल, वीर दास आणि गिरीश कर्नाड हे देखील मुख्य भूमिकेत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.