फादर्स डे स्पेशल : 'या' कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना...

11
11
Updated on

मुंबई : आज सर्वत्र वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा करत आहेत. त्यानिमित्त अनेकजणांनी समाज माध्यमातून, प्रत्यक्ष आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याच निमित्ताने विविध वाहिन्यांवरील कलाकारांनी सांगितले आहे आपल्या वडिलांबद्दल....

निशांत मलकानी : झी टीव्हीवरील 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये  निशांत मलकानी काम करतो. तो सांगतो की,  माझ्यावर माझ्या वडिलांचा मोठा प्रभाव असून मला समजायला लागले  त्यावेळेपासून मी वडिलांचे अनुकरण केले आहे. माझे वडील मला नेहमी सांगायचे की , तू नेहमी तुझ्या मनाचे ऐक. मी माझ्या मनाचे ऐकले पण माझ्या आई-वडिलांच्या विचाराने मला योग्य दिशा मिळाली. ते एक निष्ठावान व्यक्ती होते ज्यांनी नेहमी कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावले आणि मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे.

सिद्धांत सूर्यवंशी : 'क्यो रिश्तो मे कट्टी बट्टी'मधील सिद्धांत म्हणतो, की एक वडील होणे आणि आपल्या अपत्याकडून प्रेम मिळणे मोठी बाब आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आईसारखे होऊ शकत नाही आणि पित्याची जागा कोणीही कधीही घेऊ शकत नाही. पिता बनून मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मला पित्याचे कर्तृत्व समजले. माझ्या आई-वडिलांनी चांगले संस्कार केले आणि मी येथपर्यंत आलो. माझे वडील माझे मार्गदर्शक आहेत.

अंजुम फकीह : 'कुंडली भाग्य'ची अंजुम फकीह सांगते की, माझ्या कुटुंबांसोबत व विशेषतः वडिलांसोबत अनेक आठवणी आहेत की ज्या कधीही विसरता येणार नाहीत. माझे वडील आयुष्यात व्यावहारिकदृष्ट्या वागायचे आणि तोच गुण माझ्यामध्येही आला आहे. आयुष्यात नेहमी नम्र असावे व यशाची धुंदी आपल्यावर चढता कामा नये. ही शिकवण वडिलांनी दिली. यश हे सर्वांनाच नेहमी मिळणारी बाब नाही. मात्र चांगले काम हे आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर राहते, ही वडिलांची शिकवणूक मी लक्षात ठेवली आहे.

कृष्ण भारद्वाज : सोनी सबवरील 'तेनाली रामा' या मालिकेत प्रमुख भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, की माझे वडील डॉ. अनिकेत भारद्वाज यांच्याकडून मला जन्मजात अभिनयाचे बाळकडू मिळाले. मी त्यांचे लेखन, अभिनय व दिग्दर्शक म्हणून कामाच्या प्रती त्यांची असलेली श्रद्धा पाहिली आहे. त्यांनी त्या काळी आकाशवाणी व दूरदर्शनवर काम केले. तेव्हा असे काम मिळणे दुरापास्त होते. त्यांनी खूप मेहनत व परिश्रम घेतले व मलाही त्यांनी सांगितले की कष्ट केल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही.  त्यांची ही शिकवण मी लक्षात ठेवली आहे व त्याच मार्गावर मी चालत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.