भाजपचे खासदार रवी किशनवर चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा आरोप

भाजप खासदार तथा अभिनेता रवी किशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Ravi kishan news
Ravi kishan news esakal
Updated on

भाजप (BJP) खासदार तथा अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांच्यावर मोठा आरोप करण्यात आले आहे. भोजपुरीचे प्रसिद्ध दिग्दर्शक विनोद तिवारीने काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी या चित्रपटाचे नाव जिला गोरखपूर असल्याचे सांगितले. या अगोदर सुपरस्टार रवी किशनने आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टर समोर आल्यानंतर विनोद तिवारी यांनी त्यांच्या चित्रपटाचे टायटल चोरी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यावर रवी किशन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Film Maker Allegation On Ravi Kishan For Stealing The Title Of Film)

Ravi kishan news
पारसने उर्फी जावेदच्या आरोपांना दिले उत्तर; म्हणाला - मला काही फरक पडत नाही!

या चित्रपटावरुन वाद

दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितले की २०१६ मध्ये मी एका चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचे नाव जिला गोरखपूर होते. दहा दिवसांपूर्वीच मला कळाले की रवी किशनही गोरखपूरवर कोणती तरी चित्रपट बनवत आहे. हे टायटल इम्पा देऊ शकत नाही. कारण या टायटलचे काॅपीराईट माझ्याकडे ६ वर्षांपासून आहे. मी सहा वर्षांपूर्वी माझ्या चित्रपटाच्या टायटलची काॅपीराईट घेतले होते. मी रवी किशनजी यांनाही वैयक्तिक संदेश पाठवला आहे. त्यांच्याकडे टायटलबाबत प्रश्न केले आहे. (Entertainment News)

Ravi kishan news
Sanjay Raut : पैसे खाल्ले का नाही? आरोह वेलणकरचा संजय राऊतांना सवाल

त्यांनी पुढे सांगितले की आमचा काॅमन मित्राला ही कथा ऐकवली होती. राजेश मित्राने रवीजींना दीड वर्षांपूर्वी हीच कथा ऐकवली होती. त्यांच्या व्यवस्थापकाशीही या प्रोजेक्टविषयी चर्चा झाली होती. मी त्यांना भेट इच्छित होतो. पण ते होऊ शकले नाही. जेव्हा मी इन्स्टाग्रामवर त्यांचे पोस्टर पाहिले, तेव्हा मला माझ्या चित्रपटाप्रमाणेच ते वाटले. मी त्यांचे पोस्ट होऊन हैराण झालो आहे. माननीय खासदारांनी आमच्या सारख्या लोकांच्या कष्टाचे आदर केले पाहिजे. हिंदीबरोबरच भोजपुरी भाषेतील चित्रपटावरही माझा अधिकार आहे. इम्पाने रवी किशनच्या नावावर नोटीस जारी केली आहे. वृत्तांनुसार हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.