ENTERTAINMENT NEWS : चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम मानला जाणारा filmfare awards गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांसाठी देखील दिला जात आहे. यंदाचे या पर्वाचे ६ वे वर्ष असून मुंबईत अत्यंत दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे. सर्वोत्तम कलाकृतींचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे 'प्लॅनेट मराठी' (planet marathi) हे शीर्षक प्रायोजक असून ३१ मार्च २०२२ रोजी वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये हा सोहळा रंगणार आहे.
सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav ) आणि अमेय वाघ (amey wagh) या दोन तरुण कलाकारांची सध्या मराठी चित्रपट सृष्टीला भुरळ पडली आहे. अर्थातच या दोघांनीही आपल्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केले असल्याने रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच आपल्या गायनाने कित्येक पिढ्यांवर अधिराज्य गाजवलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिनेत्री पूजा सावंत आणि मानसी नायक नृत्यातून मानवंदना देणार आहेत.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, वैभव तत्ववादी हे देखील या सोहळ्यात सहभागी होणार असून त्यांच्या कलेचा नजराणा उपस्थितांना पाहायला मिळणार आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिचे विशेष नृत्य या सोहळ्यात असेल, अशी माहिती सूत्रांकडून कडून मिळाली आहे.
'फिल्मफेअरने मराठी चित्रपटसृष्टीचा अनेक दशकांचा चढता आलेख अनुभवला आहे. मराठी चित्रपटाने कायमच उत्तम कथानकांसह चोखंदळ सिनेप्रेमींना आकर्षित केले आहे. या प्रवासाचा आम्ही एक भाग राहिलो आहोत. आम्ही, फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या माध्यमातून या गुणवंत चित्रपटसृष्टीचा आणि असामान्य चित्रकृतींचा गौरव केला आहे.' असे या पुरस्कारसोहळ्याबद्दल वर्ल्डवाइड मीडियाचे सीईओ दीपक लांबा म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.