Faruk Kabir News: फिल्म निर्माते फारुक कबीर यांची पत्नी आणि सासूविरोधात बाळ चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फरार झालेल्या फारूक कबीर यांच्या पत्नीला आणि सासूला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. नवजात बाळाला घेऊन पत्नी आणि सासू देश सोडून बाहेर जात असल्याची तक्रार फिल्म निर्माते फारुक कबीर यांनी दिली होती.
फारुक कबीर यांच्या तक्रारीनुसार वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने त्यांच्या सासू आणि पत्नीला अटक केलीय.
फारूक कबीर यांची पत्नी सनम आणि सासू दिल्फुझा यांना अमृतसरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. चोरी झालेल्या बाळाला पुन्हा त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलंय. दया नायक यांच्या पथकाने ही कामगिरी केलीय.
"निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या टीमने सनम उर्फ शोक्सनम, दिलफुजा आणि बाळाचा अमृतसरला शोध घेतला. त्यांनी त्यांना मुंबईत आणले आणि पुढील तपासासाठी वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात दिले," असे पोलिस उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले.
कबीर आणि सनमचे गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये लग्न झाले आणि तेव्हापासून ते भारतात राहत होते. डिसेंबरमध्ये त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर मात्र अनेक समस्या उद्भवल्या. सनम आणि तिच्या पालकांनी त्याला उझबेकिस्तानाचे नागरिकत्व मिळावे म्हणून आग्रह धरला.
फारुकने वर्सोवा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्याची पत्नी आणि तिचे आई-वडील बाळाचा जन्म दाखला, इतर कागदपत्रे आणि सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोपही त्याने केला होता.
फारुक कबीरच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, त्यांनी सनमचा अमृतसर येथे शोध घेतला आहे आणि त्यांनी या प्रकरणाबाबत परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला सूचित केले आहे. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. आणि फारुकची पत्नी आणि सासूला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.