Elvish Yadav FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा आता अडचणीत आला आहे. एल्विशविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत एल्विशवर क्लब आणि पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट देण्यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पीएफए टीमने नोएडाच्या सेक्टर 49 मध्ये एका पार्टीवर छापा टाकून कोब्रा सापाबरोबर सापाचे विषही जप्त केले. या पार्टीत 5 लोकांना अटकही करण्यात आली असल्याची माहीती आहे.
आता पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, या प्रकरणातील मुख्य आरोपी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव असल्याचे म्हटले जात आहे. एल्विशनेच ही नोएडा आणि एनसीआरमध्ये हायप्रोफाईल स्नेक बाईट पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. यामुळे आता नोएडाच्या सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विशसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात एफआयआर नोंदवत असताना, बँक्वेट हॉलमधून राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यात 9 साप आढळून आले. या प्रकरणाचा पुढील तपास व कारवाई सुरू आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी एल्विश यादव फरार आहे.
एल्विश यादव आहे तरी कोण?
एल्विशचा जन्म 14 सप्टेंबर 1997 रोजी हरियाणातील गुडगाव येथे झाला. त्यांनी एमिटी विद्यापीठातून शिक्षण तर दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली आहे.
एल्विश यादव हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय यूट्यूबर आहे. तो यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतो. 'एल्विश यादव व्लॉग्स' आणि 'एल्विश यादव' अशी दोन यूट्यूब चॅनेल तो चालवतो. यात एका चॅनलमध्ये तो रोस्ट-व्हिडिओ बनवत असतो.
या व्हिडिओमध्ये तो अनेकांना बिनदिक्कतपणे रोस्ट करायचा पण सध्या त्याचे रोस्टिंग करणं बंद केलं आहे. तर दुसऱ्या चॅनलमध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याच्या चाहत्यांना सांगत असतो. इतकच नाही तर एल्विश हा 25 व्या वर्षीच 'एल्विश यादव फाउंडेशन' देखील चालवतो.
तर यूट्यूबवर 14.5 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. रिपोर्टनुसार तो दर महिन्याला 8-10 लाख कमावतो. त्यांची एकूण संपत्ती 50 कोटींच्या जवळपास असल्याचा दावा करण्यात येतो. बिग बॉस जिंकल्यानंतर तो खुपच चर्चेत आला. त्याच्यावर या पुर्वीही बऱ्याचदा टीका करण्यात आली आहे.
सध्या, एल्विश आता अभिषेक मल्हानसोबत रिअॅलिटी शो टेम्पटेशन आयलंडमध्ये सहभागी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.