Nayanthara Against FIR: सध्या साउथची लेडी सुपरस्टार नयनतारा तिच्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिचा हा सिनेमा नुकताच रिलिज झाला. मात्र आता तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. OTT प्लॅटफॉर्म Netflix वर दाखवल्या जाणाऱ्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटात भगवान श्रीरामाचा अपमान करण्यात आला आहे. त्यासोबतच हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी नेते रमेश सोलंकी यांनी 6 जानेवारीला त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती.
तर आता मध्य प्रदेशातील जबलपूर येथे धार्मिक भावना भडकावल्याबद्दल आणि देवाचा अपमान केल्याबद्दल एका हिंदू संघटनेने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्री नयनतारा यांच्यासह संपूर्ण स्टारकास्टविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
हिंदू सेवा परिषदेचे अतुल जेसवानी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी हिंदू धर्मातील श्री राम यांचा अपमान करतात.
चित्रपटात भगवान श्रीराम यांच्या विरोधात चुकीची माहिती देत हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जेसवानी यांच्या मते, चित्रपटात लव्ह जिहाद दाखवण्यात आला आहे. प्रभू श्री राम वनवासात प्राण्यांना मारायचे आणि मांस खायचे असं सांगण्यात आलं आहे.
हिंदू सेवा परिषदेने मंगळवारी जबलपूरमधील ओमटी पोलिस स्टेशनमध्ये निर्माता-दिग्दर्शकाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. 'अन्नपूर्णी' हा चित्रपट हिंदूविरोधी आहे असा आरोप चित्रपटात करण्यात आला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माता जतिन सेठी आणि आर रवींद्रन, पुनित गोयका यासोबतच सारिक पटेल आणि मोनिका शेरगिल यांच्याविरुद्ध कलम १५३ आणि ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.