Sadashiv Amrapurkar: अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग!

सदाशिव अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागली.
Sadashiv Amrapurkar
Sadashiv Amrapurkar Esakal
Updated on

Sadashiv Amrapurkar: सिनेमा जगतात विलनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे सदाशिव अमरापूरकर यांचे नाव आजही तितक्याच अदबीने घेतले जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. सदाशिव अमरापूरकर यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला भिषण आग लागल्याचे वृत्त आहे.

Sadashiv Amrapurkar
Rohit Bal: रोहित बालची तब्येत आता कशी? काही दिवसांपुर्वी व्हेंटिलेटरवर होता फॅशन डिझायनर!

मिळालेल्या माहितीनुसार, अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागली. अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटला शॉर्टसर्किटमुळे मंगळवारी अचानक आग लागली होती. आग जास्त पसरल्याने तात्काळ अग्निशमन विभागाने पाचारण करत ही आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे.

सुमन अपार्टमेंटमध्ये सदाशिव अमरापूरकर यांच्या मालकीचे चार फ्लॅट आहेत. याच अपार्टमेंटमध्ये मकरंद खेर देखील राहतात. तर अमरापूरकर यांच्या फ्लॅटमध्ये राहत असलेल्या ज्योती पठारे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुरामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sadashiv Amrapurkar
Ravindra Berde: रविंद्र - लक्ष्मीकांत यांच्या जोडीने या नाटकातून रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ केला

सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल...

11 मे 1950 रोजी अहमदनगर येथे सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म झाला होता. अभिनयाची सुरुवात त्यांनी मराठी नाटकांपासून केली. त्याचबरोबर फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी त्यांनी जवळपास 50 नाटकांमध्ये काम केले.

खलनायकाच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांनी 90 च्या दशकात विनोदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू चालवली होती. सदाशिव हे 64 वर्षांचे असताना त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला. त्यांचे 3 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.