KAALI Controversy:निर्माती लीना मणिमेकलई विरोधात दिल्ली,यूपीत तक्रार दाखल

लीना मणिमेकलईच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवर हिंदू देवता धुम्रपान करताना दाखवल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गदारोळ माजला होता.
FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film Poster
FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film PosterGoogle
Updated on

निर्माती-दिग्दर्शक लीना मणिमेकलई(Leena Manimekalai) हे नाव सध्या तिच्या वादग्रस्त(Controversy) 'काली'(KAALI) सिनेमाच्या पोस्टरमुळे भलतंच चर्चेत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू झालेलं वादाचं हे वादळ थांबायचं नावच घेत नाहीय. एकीकडे लीना विरोधात सोशल मीडियावर लोक आपला राग ओकत आहेत तर दुसरीकडे दिल्लीत लीना मणिमेकलई विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता दिल्लीत काली सिनेमाविषयी साहिबाबादचे विधायक सुनिल शर्मा यांनी निर्माती विरोधात इंदिरापुरम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी लीनावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावला आहे. तसंच समाजात हिंदू देवतांविरोधात चुकीची समजूत पसरवल्या प्रकरणी लीना विरोधात कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.(FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film Poster)

FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film Poster
Watch Darlings teaser: बेडूक-विंचवाची गोष्ट सांगत आलियानं वाढवला सस्पेन्स

माहितीनुसार,लीना मणिमेकलाईचा सिनेमा 'काली' विषयी आरोपपत्रात लिहिलं गेलं आहे की, ''जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की हिंदू धर्माची प्रमुख देवी ही मां काली आहे. २ जुलै,२०२२ रोजी निर्माती लीना मणिमेकलाईने आपल्या आगामी 'काली' डॉक्युमेन्ट्रीचे पोस्टर आणि ट्रेलर रिलीज केलं आहे, ज्यामध्ये मां काली बनलेली अभिनेत्री धुम्रपान करत आहे. हे असं दृश्य पाहिल्यावर माझ्या मनला खूप वेदना झाल्या आणि माझ्यासोबतच हिंदू धर्माच्या अस्तित्वाला,सम्मानाला देखील धक्का पोहोचला''.

FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film Poster
Alia Bhatt Pregnancy: 'आणि मी रडलो...', करण जोहरनं सांगितला 'तो' भावूक क्षण

या तक्रारीत पुढे लिहिलं आहे की,''निर्माती लीना मणिमेकलईनं देशात हिंदू धर्माविरोधात गैरसमजूत आणि धार्मिक वाद पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण देशात या वादग्रस्त पोस्टरमुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लीना मणिमेकलईवर यासाठी कठोर कारवाई करावी ही विनंती. अयोध्येत 'काली' सिनेमाच्या वादग्रस्त पोस्टरला पाहिल्यानंतर साधु-संतांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. त्यांची मागणी आहे की या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणली जावी आणि लीना मणिमेकलई विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले जावेत''.

FIRs in Delhi, UP Against Leena Manimekalai for 'Kaali' Documentary Film Poster
'पुष्पा 2' नं टाकला सुटकेचा निश्वास,मिळाला हवा तो खलनायक,वाचा सविस्तर

निर्माती लीना मणिमेकलई काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपल्या 'काली' सिनेमाचा पोस्टर शेअर केला होता. ज्यामध्ये हिंदू देवी काली मातेच्या अवतारात एक अभिनेत्री धु्म्रपान करताना दिसत आहे. जसं हे पोस्टर समोर आलं तसं ते पाहिल्यावर लोकांचा राग अनावर झाला. एवढं होऊनही लीनानं माफी मागितलेली नाही. तिचं म्हणणं आहे की, ती कुणालाच घाबरत नाही. लीना सध्या कॅनडामध्ये राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.