Reshma Pathan: "बसंतीच्या मागे गुंड लागतात तेव्हा..."; स्टंट वूमन रेशमा पठाण यांनी सांगितला शोलेच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा

भारताच्या पहिल्या स्टंट वूमन रेशमा पठाण यांनी नुकतीच 'सकाळ' ला एक विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
Reshma Pathan
Reshma Pathanesakal
Updated on

Reshma Pathan: शोले (Sholay) या बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटातील एक-एक सीन लोक आजही आवडीनं बघातात. या सिनेमातील डायलॉग्स तसेच यामधील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सिनेमातील हेमा मालिनी (Hema Malini) यांनी टांगा चालवणाऱ्या बसंतीची भूमिका साकारली. ही निडर आणि बिंधास्त बसंती आपल्या धन्नो या घोडीच्या मदतीनं गुंडांच्या तावडीतून कशी सुटते? हे शोले सिनेमाच्या एका सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. पण या सीनमधील स्टंट्स हे हेमा मालिनी यांनी केले नसून भारताच्या पहिल्या स्टंट वूमन रेशमा पठाण (Reshma Pathan) यांनी केले आहेत. शोले गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या पहिल्या स्टंट वूमन रेशमा पठाण यांनी नुकतीच 'सकाळ' ला एक विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

रेशमा पठाण यांचा शोले सिनेमातील पहिला सीन

रेशमा पठाण यांनी मुलाखतीत शोले सिनेमातील त्यांच्या पहिल्या सीनबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या,"शोले सिनेमाचा पहिला सीन मी शूट केला होता, तो म्हणजे बसंतीच्या मागे जेव्हा गुंड लागतात. हेमा मालिनी या एका तलावाच्या बाजूला बसल्या आहेत, नंतर बसंतीच्या मागे काही गुंड उभे असतात, हेमाजींचा क्लॉजअप शॉटनंतर झाला, त्याआधी माझा सीन शूट झाला. ज्यामध्ये मी पळत येते आणि म्हणते, चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है, खरंतर सिनेमात हा डायलॉग हेमाजींचा आहे, पण शूटिंगवेळी मी हा डायलॉग म्हणायचे. त्या सीनमध्ये घोडी खूप स्पीडमध्ये धावत होती. त्यावेळी मी टांग्याच्या मागच्या बाजूने चढून पुढे येते, असा तो शॉट होता."

...जेव्हा शोले गर्ल रेशमा पठाण यांना धर्मेंद्रजींनी 100 रुपये बक्षीस म्हणून दिले

रेशमा पठाण यांनी शोले सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडलेला आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "शोले सिनेमामधील होली के दिन हे गाणं झाल्यानंतर एका लहान मुलीचा सीन होता. त्या सीनमध्ये त्या मुलीला घेऊन मला घोड्यांच्यामधून पळून जायचं होतं. सिनेमातील त्या शॉटमध्ये माझा चेहरा दिसतो. जेव्हा मी त्या मुलीजवळ तिला उचलण्यासाठी गेले तेव्हा ती मुलगी खाली पडली. ती वेळ विचार करण्याची नव्हती कारण मागून 350-400 घोडे येत होते. तेव्हा मी त्या मुलीला जवळ घेऊन जमिनीवर रोल करत घोड्यांच्या पायांच्या मधून निघाले. तो शॉट देखील सिनेमात ठेवण्यात आला होते. तेव्हा धर्मेंद्रजींनी मला 100 रुपये दिले होते."

रेशमा पठाण यांनी सांगितला 'शोले' च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा

स्टंट वूमन रेशमा पठाण यांनी सांगितला, "मला शोले सिनेमाच्या शूटिंग वेळी टांगा चालवण्याचा एक सीन करायला सांगितला. त्यावेळी मी टांग्यात बसले आणि टांगा चालवत खूप लांब गेले. त्यानंतर सेटवरील सर्व लोक विचार करत होते की, ही टांगा घेऊन कुठे निघून गेली?"

पाहा संपूर्ण मुलाखत:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.