friendship day 2023 : जागतिक मैत्री दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे.. आज आपल्या मित्राला काय द्यायचं याबाबत सर्वजण उत्सुक आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राचा किंवा मैत्रिणीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने प्रत्येकजन आपल्या मित्र मैत्रिणींविषयी प्रेम व्यक्त करत असतो, भेटवस्तू देत असतो. कलाकारांमध्येही असेच मैत्रीचे बंध आपल्याला पाहायला मिळतात. कधी एकत्र काम करून तर इतर काही करणारे निर्माण झालेले हे बंध कलाकार अगदी आवडीने जपतात. म्हणून येत्या फ्रेंडशिपच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere) आणि संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) यांच्यातील खास नाते कसे आहे ते पाहूया..
(friendship day 2023 : prarthana behere and sankarshan karhade friendship bonding majhi tujhi reshimgath) (friendship day 2023)
कलाकारांच्या पडद्यावर दिसणाऱ्या बॉण्डिंगच्या प्रेमात प्रेक्षक नेहमीच असतात. पण या उत्तम ऑनस्क्रीन बॉण्डिंगचं मूळ कारण असतं ते म्हणजे पडद्यामागची त्यांची मैत्री. मालिकेच्या निमित्ताने भेट होऊन काहींची कमी वेळातच चांगली मैत्री होते. असेच दोन आघाडीचे कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतल्या यांच्या मैत्रीचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. याच निमित्ताने निमित्ताने त्यांचे भेट झाली आणि त्यांची छान गट्टी जमली.
या मैत्रीविषयी प्रार्थना म्हणते, 'संकर्षण आणि मी खूप कमी दिवसात एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण झालो आहोत. सर्वप्रथम आम्हा दोघांचं खूप चांगलं जुळतं आणि मला त्याचं म्हणणं नेहमी पटतं. त्याचं वागणं-बोलणं, त्याचे संस्कार, त्याचे विचार फार प्रभावी आहेत. रोज जेव्हा आम्ही गप्पा तेव्हा मला नवीन काहीतरी त्याच्याकडून शिकायला, जाणून घ्यायला मिळतं. तो खरोखर एक गुणी मुलगा आहे. जितका तो गुणी आहे तितकाच तो खोडकरही आहे. सेटवर खूप मस्ती करणारा, कोणाची टिंगल करणारा, मिमिक्री करणारा जर कोणी असेल तर तो संकर्षण आहे. त्यामुळे तो मला सेटवर कायम हसवत असतो. तो जितका खोडकर आहे तितकाच तो संस्कारीही आहे. त्याला आता दोन मुलं आहेत आणि त्यांनाही संकर्षण उत्तम संस्कार देतोय हे बघून मला खूप छान वाटतं. तो एक हरहुन्नरी कलाकार आहे; लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सूत्रसंचालक अशा अनेक भूमिका तो समर्थपणे साकारतोय. ज्याप्रकारे तो स्वतःचं स्वतः अभ्यास करून अभिनय करतो हे मी रोज बघते. तो अत्यंत हुशार आहे, पण त्याला अजिबात त्याचा गर्व नाही. याउलट तो सतत नवं काय करता येईल, नवं काय शिकता येईल याच्या मागे असतो. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचंय, मोठं व्हायचंय आणि त्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. एखादी नवीन कविता केली की तो मला आवर्जून ऐकवतो. कोणतीही व्यक्ती जर आधी चांगली माणूस असेल तर तिच्या कामातही ते दिसून येतं आणि तसंच संकर्षणच्या बाबतीतही होतं. त्याचा स्वभाव हा अत्यंत प्रामाणिक, निर्मळ असल्याने त्याने लेखन केलं, अभिनय केला किंवा दिग्दर्शन केलं; त्याचं काम हे उत्तमच होतं."
तर दुसरीकडे संकर्षणने प्रार्थनाबद्दल बोलताना सांगितलं, "प्रार्थना खूप खरी आहे आणि ती सगळ्यांबरोबर सारखी आहे. तिच्यात भेदभाव ही भावनाच नाही. तिची पार्श्वभूमी व आताची तिची प्रसिद्धी यांचा विचार करताना हा थोडा जवळचा, हा थोडा लांबचा, या लोकांबरोबरच रहायचं, त्या लोकांशी बोलायचंच नाही असे ती कप्पे कधीच करत नाही. तिचा स्वभाव हा सगळ्यांसाठी सारखा आहे. ती सर्वांना सामावून घेते; हा तिच्यातला खूप चांगला गुण आहे आणि तो मला आत्मसात करायला खरोखर आवडेल. कारण एखादी व्यक्ती माझ्या जवळची झाली तर ती खूप जवळची होते नाहीतर अजिबात होत नाही; पण प्रार्थनाचं तसं नाही. तसंच तिच्यात एखादी गोष्ट स्वीकारण्याची ताकद आहे. जर तिला काहीतरी येत नसेल तर प्रामाणिकपणे ती ते मान्य करते व येत नसलेली ती गोष्ट शिकण्यासाठी ती प्रयत्न करते. मला वाटतं कोणत्याही कलाकारात ही स्वीकारण्याची ताकद असणं खूप महत्वाचं असतं जी प्रार्थनामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. अभिनेत्री म्हणून ती खूप मेहनती आहे. मला तिचं मितवा चित्रपटातलं काम खूप आवडलं. त्यासोबतच 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा कामत ही भूमिका ती ज्याप्रकारे साकारत आहे त्यासाठी तिचं खूप कौतुक वाटतं. कारण ही भूमिका तिच्यासाठी आव्हानात्मक होती. सेटवरती आमची मजा मस्ती सुरूच असते. मालिकेत आमच्यात जसं बॉण्डिंग दिसतं तशीच छान मैत्री आमची ऑफक्रीनही आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.