Friendship Day: नसीरुद्दीन यांना वाचवण्यासाठी ओम पुरींनी जीवाची बाजी लावली..

नसीरुद्दीन यांच्यावर चाकून हल्ला होणार होता तितक्यात ओम पुरींनी...
Om Puri And Naseeruddin Shah
Om Puri And Naseeruddin Shahesakal
Updated on

Om Puri And Naseeruddin Shah : हिंदी सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार ओम पुरी आणि नसीरुद्दीन शहा चांगले मित्र आहेत. दोघांचीही मैत्री खूप जुनी आहे. या मैत्रीत अशी घटना घडली होती, की एकदा नसीरुद्दीन शहा यांचा जीव वाचवण्यासाठी ओम पुरी यांनी चाकू हल्लेखोराशी दोन हात केले होते. ही घटना मुंबईच्या एका रेस्टाॅरंटच्या बाहेर घडली होती.

ओममुळे जीव वाचला

ही घटना १९७७ मध्ये घडली आहे. मुंबईच्या एका रेस्टाॅरंट बाहेर नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) यांच्या एका जुन्या मित्रानेच त्यांच्यावर हल्ला केला होता. आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख करत ते लिहितात, की जसे माझ्यावर हल्ला झाला. ओम पुरी हल्लेखोरावर तुटून पडले आणि त्याला नियंत्रित केले. त्यानंतर ओम पुरी (Om Puri) यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. (friendship day om puri save his friend naseeruddin shah's life)

Om Puri And Naseeruddin Shah
Shahrukh Khan : शाहरुखचा भन्नाट डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

जुन्या मित्रानेच केला होता घात

नसीरुद्दीन यांनी सांगितले, की आम्ही तेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. मी आणि ओम रात्री जेवण करत होतो. त्याच वेळी जसपाल तेथे पोहोचला. त्याच्या मनात माझ्याविषयी राग होता. जसपालने ओमला नमस्कार घातला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर माझ्या कमरेत काहीतरी धारदार वस्तू घुसल्याचे जाणवले. मग मी पाहिले जसपाल रक्ताने माखलेले चाकू घेऊन समोर उभा होतो.

काही वेळाने दवाखान्यात

पुढे लिहितात, जसपालने पुन्हा चाकू वार करण्याचा प्रयत्न केला. ओमने आणि दोन लोकांनी त्याला नियंत्रित केले. त्यानंतर मला दवाखान्यात नेण्यापूर्वी पोलिसांची प्रतिक्षा करत असलेल्या रेस्टाॅरंट व्यवस्थापकाबरोबर ओम वाद करु लागला. बराच वेळेनंतर आम्ही कपूर दवाखान्यात गेलो होतो. (Bollywood News)

Om Puri And Naseeruddin Shah
मी प्रत्येक वर्षी ४ चित्रपट बनवणारा अभिनेता नाही...किच्चा सुदीप

दोघांनीही केला एकत्र अभिनय

ओम पुरी आणि नसीरुद्दीन शहा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियात बरोबर शिकत होते. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्तम अभिनयही केला आहे. २०१७ मध्ये अभिनेता ओम पुरी यांचे निधन झाले होते. (Friendship Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.