Fukrey 3 Box Office Collection: 5 दिवसात फुकरे सुसाट! हाफ सेंच्युरी करत भोली अन् चुचाच्या जोडीनं लावलं प्रेक्षकांना वेड!

 Fukrey 3 Box Office Collection:
Fukrey 3 Box Office Collection:Esakal
Updated on

Fukrey 3 Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर तीन सिनेमे एकमेकांना टक्कर देत आहेत. ज्यात एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'फुकरे 3' आणि 'चंद्रमुखी 2'.

28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमध्ये कलेक्शनच्या बाबतीत बाजी मारली ती फुकरे बॉईजने. 'फुकरे' च्या पहिल्या दोन भागाप्रमाणे फुकरे 3 या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

 Fukrey 3 Box Office Collection:
Bigg Boss 17 House: असं असेल बिग बॉसच्या 17 व्या सिझनचं आलिशान घर! व्हिडिओ व्हायरल

पहिल्या दिवसापासूनच फुकरे 3 या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले कलेक्शन केले. नवीन कमाईचे आकडे बघता फुक्रे 3 ने शाहरुखच्या जवानला देखील पाचव्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यात मागे टाकले आहे.

 Fukrey 3 Box Office Collection:
Yodha New Release Date: शाहरुखच्या 'डंकी' अन् प्रभासच्या 'सालार'ला 'योद्धा' घाबरला! करणने घेतली माघार?

Fukrey 3 ने पहिल्या दिवशी एकूण 8.82 कोटींची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 7.81 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर तिसऱ्या दिवशी 11.67 कोटी अन् चौथ्या दिवशी 15.18 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.

या चित्रपटाने पाचव्या दिवशी एकूण 11.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. या पाच दिवसाच्या कमाईसह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 54.98 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे आता फुकरे 3 लवकरच 100 कोटींच्या टप्पा पार करेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

 Fukrey 3 Box Office Collection:
OMG 2 OTT Release: अक्षयचा 'ओएमजी 2' OTT वरही गाजणार! जाणुन घ्या कुठे आणि केव्हा येईल पाहता..

फुकरे 3 हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला एक चांगला संदेश देतो. या चित्रपटाचा पहिला भाग 2013 मध्ये आला त्यानंतर Fukrey Returns हा दुसरा भाग 2019 मध्ये रिलिज झाला होता. त्यानंतर आता हा तिसरा भाग रिलिज करण्यात आला आहे. . या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा यांनी केले आहे. पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चढ्ढा स्टारर चित्रपट फुक्रे 3 आता किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.